Beauty Care: ओठ काळे पडलेत, त्यामुळे पूर्ण लूक खराब होतोय? 'या' टिप्सने पुन्हा मिळतील गुलाबी लिप्स-beauty care tips marathi home remedies to remove black lips ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Beauty Care: ओठ काळे पडलेत, त्यामुळे पूर्ण लूक खराब होतोय? 'या' टिप्सने पुन्हा मिळतील गुलाबी लिप्स

Beauty Care: ओठ काळे पडलेत, त्यामुळे पूर्ण लूक खराब होतोय? 'या' टिप्सने पुन्हा मिळतील गुलाबी लिप्स

Aug 18, 2024 12:51 PM IST

Beauty Care Tips In Marathi: तुम्ही धुम्रपान करत नसला तरी सूर्यप्रकाश आणि दगदगीच्या जीवनशैलीमुळे तुमच्या ओठांचा रंग बदलू लागतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या ओठांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

गुलाबी ओठांसाठी टिप्स
गुलाबी ओठांसाठी टिप्स

Remedies to get rid of black lips: चेहऱ्याच्या सौंदर्यात ओठ महत्वाची भूमिका बजावत असतात. गुलाबासारखे गुलाबी आणि मऊ ओठ प्रत्येकालाच आवडतात. स्त्री असो की पुरुष, प्रत्येकालाच आपले ओठ गुलाबी राहावे असे वाटत असते. पण कधी कधी असे होते की ओठांचा रंग आपोआप काळा होऊ लागतो. तुम्ही धुम्रपान करत नसला तरी सूर्यप्रकाश आणि दगदगीच्या जीवनशैलीमुळे तुमच्या ओठांचा रंग बदलू लागतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या ओठांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

तुम्ही पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात तुमच्या ओठांची योग्य काळजी घेतली नाही तर त्यांचा काळेपणा आणखी वाढेल. ज्यामुळे तुम्हाला तणाव वाटू शकते. ओठांना गुलाबी करण्यासाठी अनेक प्रकारचे उपचार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. परंतु तुम्हाला हवे असल्यास काही घरगुती उपाय करून तुम्ही तुमच्या ओठांचा गुलाबीपणा परत मिळवू शकता. या उपायाने तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही. शिवाय ओठांचे स्वास्थ्यसुद्धा उत्तम राहील. या घरगुती उपायांनी अगदी काही दिवसातच ओठांचा काळेपणा दूर होईल. हे उपाय कररण्यापूर्वी, एकदा पॅच टेस्ट करा, जेणेकरून तुम्हाला त्यांची ॲलर्जी आहे की नाही हे कळू शकेल. आणि त्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही.

एलोवेरा जेल-

जर तुमच्या घरी ताज्या कोरफडीचे जेल असेल, तर ते ओठांवर लावल्याने त्यांचा काळेपणा कमी होऊ शकतो. कोरफडमध्ये नैसर्गिकरित्या अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात जे ओठांचा रंग सुधारतात.

लिंबू आणि मध-

तुम्हाला तुमच्या घरात लिंबाचा रस आणि मध सहज मिळेल. या दोन गोष्टी मिक्स करून ओठांवर लावा. १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका. लिंबू एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे आणि मध मॉइश्चराइजर आहे . परंतु ते वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट अवश्य करा.

गुलाबाच्या पाकळ्या-

या उपायासाठी गुलाबाच्या पाकळ्या वापरणे थोडे कठीण आहे. परंतु हा उपाय खूप फायदेशीर आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या बारीक कराव्या लागतील, नंतर त्यात दूध मिसळून अलगद ओठांवर लावा. यामुळे ओठांचा रंग सुधारतो आणि काळेपणा दूर होतो.

नारळ तेल-

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी हा उपाय सर्वात सोपा आहे. हे वापरण्यासाठी, तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या ओठांवर खोबरेल तेल लावावे लागेल. हे ओठांना मॉइश्चरायझ करते आणि त्यांचा रंग सुधारते. यामुळे ओठांचा काळेपणाही गायब होतो.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)