Beauty Care Tips: ओपन पोर्स आणि पिंपल्समुळे चेहऱ्यावर पडलेत खड्डे? 'या' घरगुती उपायाने गुळगुळीत होईल त्वचा-beauty care tips home remedies for open pores and pimple marks ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Beauty Care Tips: ओपन पोर्स आणि पिंपल्समुळे चेहऱ्यावर पडलेत खड्डे? 'या' घरगुती उपायाने गुळगुळीत होईल त्वचा

Beauty Care Tips: ओपन पोर्स आणि पिंपल्समुळे चेहऱ्यावर पडलेत खड्डे? 'या' घरगुती उपायाने गुळगुळीत होईल त्वचा

Aug 15, 2024 02:50 PM IST

Home Remedies for Open Pores: अनेकदा ओपन पोर्समुळे पूर्ण चेहरा खराब होतो. चेहऱ्यावर उघडलेले रोमछिद्र हे मुख्यत्वे मोठे खड्डे असतात.

ओपन पोर्सवर घरगुती उपाय
ओपन पोर्सवर घरगुती उपाय

Home Remedies for Open Pores: प्रत्येक व्यक्तीसाठी आपला चेहरा फारच महत्वाचा असतो. त्यामुळेच लोक चेहऱ्याची उत्तम प्रकारे काळजी घेत असतात. परंतु तरीही चेहेऱ्याच्यासंबंधित अनेक समस्या उद्भवत असतात. त्यातीलच एक मुख्य समस्या म्हणजे ओपन पोर्स अर्थातच रोमछिद्रे होय. अनेकदा ओपन पोर्समुळे पूर्ण चेहरा खराब होतो. चेहऱ्यावर उघडलेले रोमछिद्र हे मुख्यत्वे मोठे खड्डे असतात. ओपन पोर्स हे खासकरून नाक आणि गालावर दिसतात. या उघड्या रोमछिद्रांमुळे चेहऱ्याची त्वचा खडबडीत दिसू लागते आणि त्वचेचा पोत खराब होतो. सामान्यत: खुल्या छिद्रांची समस्या तेलकट त्वचा, हार्मोन्स, आनुवंशिकता, वृद्धत्व, जास्त सूर्यप्रकाश किंवा चेहऱ्यावरील दाट केसांमुळे उद्भवते. अनेकांना ओपन पोर्सचं टेन्शन येतं. परंतु आता त्याची चिंता नको. आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याद्वारे तुमचे ओपन पोर्स तर दूर होतीलच. शिवाय तुमची त्वचा अगदी चमकदार आणि गुळगुळीत दिसेल.

कोरफड (एलोवेरा) -

कोरफड ही वनस्पती अत्यंत औषधीय आहे. या वनस्पतीच्या वापराने विविध प्रकारच्या केसांच्या, त्वचेच्या समस्या दूर होतात. ताज्या कोरफडच्या नियमित वापरामुळे उघडलेले छिद्र कमी होऊ शकतात. यासाठी कोरफडीचे गर काढून ते तासभर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. त्यांनंतर १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा. आणि नंतर थंड पाण्याने धुवून घ्या. शिवाय रात्रभर चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावूनही झोपू शकता. अशाने तुमच्या चेहऱ्यावरील ओपन पोर्स आणि त्यामुळे पडलेले खड्डे दूर होतील.

ब्राऊन शुगर -

त्वचेला एक्सफोलिएट केल्याने खुली रोमछिद्रेही कमी होऊ शकतात. त्यासाठी एका कपमध्ये एक चमचा ब्राऊन शुगर घाला. आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घाला. हा तयार केलेला साखरेचा स्क्रब तुमच्या बोटांनी उघड्या छिद्रांवर २ मिनिटे घासून नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून एकदा वापरता येतो. असे केल्याने अगदी काहीच दिवसांत तुम्हाला फरक दिसून लागतो.

दही-

दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड मोठ्या प्रमाणात असते. म्हणून ते त्वचेला एक्सफोलिएट करण्यास आणि पिंपल्स बरे करण्यास मदत करते. याशिवाय दह्यामध्ये अनेक प्रकारच्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. जे तुमचे रोमछिद्र बंद करतात आणि पिंपल्सना कारणीभूत असलेल्या सर्व प्रकारच्या जीवाणूंवर उपचार करतात. दही फेस पॅक म्हणून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला ओलावा मिळतो. आणि तिची लवचिकता वाढते. परंतु नेहमी कमी फॅट असलेलेच दही वापरा. त्यामुळे तुम्हाला विशेष फायदा दिसून येईल. दह्याच्या वापराने ओपन पोर्स आणि खड्डे भरपूर प्रमाणात कमी होतात.

अंड्याचा पांढरा भाग -

उघडलेले रोमछिद्र कमी करण्यासाठी तुम्ही अंड्याचा पांढरा भाग उघड्या छिद्रांवर लावू शकता. यासाठी एका अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि त्यात एक चमचा ओटमील आणि २ थेंब लिंबाचा रस घाला. हे मिश्रण उघड्या छिद्रांवर १० मिनिटे लावा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. या उपायाने तुमचे ओपन पोर्स आणि खड्डे हळूहळू दूर होतील. आणि तुम्हाला पुन्हा गुळगुळीत त्वचा मिळेल.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )