मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Lightening: निर्जीव त्वचेवर ग्लो आणतो मुलतानी माती आणि चिंचेचा फेस पॅक, असा वापरा

Skin Lightening: निर्जीव त्वचेवर ग्लो आणतो मुलतानी माती आणि चिंचेचा फेस पॅक, असा वापरा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 26, 2023 06:05 PM IST

Beauty Benefits of Tamarind and Multani Mitti: हिवाळ्यात स्किन ड्राय होते त्यामुळे ती निर्जीव आणि डल दिसू लागते. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हा फेस पॅक ट्राय करु शकता.

मुलतानी माती आणि चिंचेचा फेस पॅक
मुलतानी माती आणि चिंचेचा फेस पॅक

Tamarind and Multani Mitti Face Pack for Skin Lightening: आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे, बहुतेक लोक त्यांच्या आहाराकडे किंवा त्यांच्या स्किन केअरकडे योग्य लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे कोरडी निर्जीव त्वचा तुमच्यासाठी त्रासाचे कारण बनू लागते. निरोगी आणि तजेलदार त्वचेसाठी आहारासोबतच योग्य काळजी घेणेही खूप गरजेचे असते. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही तुमच्या निस्तेज त्वचेमुळे त्रास होत असेल, तर त्वचा सुधारण्यासाठी चिंचेची मदत घ्या.

चिंचेच्या आंबट-गोड चवीमुळे तोंडाची चव तर सुधारतेच, पण त्यापासून बनवलेला फेस पॅकही व्यक्तीचा रंग सुधारून निरोगी ठेवण्यास मदत करतो. चिंचेच्या गरमध्ये असलेले पोषक तत्व त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे काम करतात, ज्यामुळे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते. वास्तविक, चिंचेच्या गर मध्ये हायड्रॉक्सी अॅसिड आढळते, जे त्वचा उजळण्याचे काम करते. याशिवाय चिंचेचे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी चेहऱ्याचा रंग निखळ करण्याचे काम करतात. चिंचेपासून बनवलेल्या या फेस पॅकमध्येअसलेली मुलतानी माती चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. अशा परिस्थितीत त्वचेवर चांदण्यासारखी चमक आणण्यासाठी मुलतानी माती आणि चिंचेचा फेसपॅक कसा लावायचा ते जाणून घेऊया.

मुलतानी माती आणि चिंचेचा फेस पॅक बनवण्यासाठी आवश्यक गोष्टी

- चिंचेचा कोळ - २ चमचे

- मुलतानी माती - १ चमचा

- एलोवेरा जेल - १ चमचा

मुलतानी माती आणि चिंचेचा फेस पॅक बनवण्याची पद्धत

मुलतानी माती आणि चिंचेचा फेस पॅक बनवण्यासाठी प्रथम चिंचेचा कोळ २ ते ३ चमचे पाण्यात विरघळवून त्याचे पाणी गाळून घ्या. आता चिंचेच्या पाण्यात मुलतानी माती आणि एलोवेरा जेल चांगले मिक्स करा. यानंतर चेहरा पाण्याने धुवा आणि मुलतानी माती आणि चिंचेचा फेस पॅक लावा. हा फेस पॅक चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे राहू द्या. फेस पॅक सुकल्यावर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. ऑइल स्किन असलेले लोक आठवड्यातून दोनदा हा फेसपॅक वापरू शकतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग