Perfect Beard Look Tips: आजच्या काळात परफेक्ट लुक येण्यासाठी पुरुष दाढीकडे विशेष लक्ष देतात. तरुण आणि पुरुषांमध्ये दाढीचा लूक ट्रेंडमध्ये आहे त्यालाच आपण 'बिअर्ड लूक' म्हणतो. दाढी वाढविण्याची क्रेझ अभिनेत्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत झपाट्याने वाढली आहे. ज्या लोकांना दाट दाढी नाही त्यांना या गोष्टीची खूप काळजी वाटते. शरीरात हार्मोन्सच्या कमतरतेमुळे दाढीचे केस वाढत नाहीत. टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या कमतरतेमुळे दाढी आणि शरीराचे केस कमी-जास्त प्रमाणात वाढू शकतात.
पण ज्या लोकांची दाढी विरळ असते ते अनेकदा दाढी वाढवण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर करतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला दाट दाढी वाढविण्याचा सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत. आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या दालचिनी पावडर आणि लिंबाचा वापर दाढीच्या चांगल्या वाढीसाठीदेखील होऊ शकतो. हा उपाय खूप फायदेशीर मानला जातो. दालचिनी आणि लिंबाचा वापर दाढी वाढवण्यासाठी कसा करावा आणि त्याचे फायदे हे आपण आज जाणून घेणार आहोत.
आपल्या स्वयंपाक घरात उपलब्ध असणाऱ्या दालचिनी आणि लिंबाचा वापर चांगल्या आणि दाट दाढीसाठी खूप फायदेशीर आहे. याचा नियमित वापर केल्याने दाढीचे केस दाट होतात आणि चांगले दिसतात. तज्ज्ञांच्या मते, दालचिनी आणि लिंबूमध्ये असलेले गुणधर्म चेहऱ्यावरील केसांची छिद्रे सक्रिय करण्यास मदत करतात. लिंबाच्या रसात दालचिनी पावडर मिसळून नियमितपणे दाढीवर लावल्याने केसांची निरोगी वाढ राखण्यास मदत होते. दाढीच्या केसांची वाढ सुधारते आणि केस दाट होतात.
पुरुषांना दाढीचे केस दाट करण्यासाठी आणि त्यांना एक परिपूर्ण लुक देण्यासाठी दालचिनी पावडर आणि लिंबाचा रस सहजपणे वापरता येतो. यासाठी सर्वप्रथम दालचिनीचे तुकडे घेऊन ते चांगले बारीक करून पावडर बनवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बाजारातून दालचिनी पावडरही विकत घेऊ शकता. २ चमचे दालचिनी पावडरमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि चांगले एकजीव करून घ्या. यानंतर ही पेस्ट २ ते ३ मिनिटे फेटून घ्या. आता तुमची पेस्ट तुम्ही दाडीवर लावू शकता. २० मिनिटे तसेच ठेऊन त्यांनंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका.
आयुर्वेदानुसार, दालचिनी आणि लिंबाचा रस लावल्याने चेहऱ्याची छिद्रे उघडतात. आणि पेशींमध्ये रक्त प्रवाहही वाढतो. याचा नियमित वापर केल्याने तुमच्या दाढीची वाढदेखील सुधारेल. परंतु ही पेस्ट वापरण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट नक्की करा. तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते वापरणे टाळा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही पेस्ट वापरल्याने तुम्हाला फायदा होईल. या पेस्टच्या वापराने तुमची दाढी दाट होऊन तुमच्या चेहऱ्याला एक परिपूर्ण लूक येईल.