Cleaning Tips: घरातील बाथरूम स्वच्छ ठेवणे होतंय कठीण, येतेय दुर्गंधी? 'या' टिप्सने आरशासारखं चमकेल-bathroom cleaning tips remove bathroom dirt with these home remedies ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cleaning Tips: घरातील बाथरूम स्वच्छ ठेवणे होतंय कठीण, येतेय दुर्गंधी? 'या' टिप्सने आरशासारखं चमकेल

Cleaning Tips: घरातील बाथरूम स्वच्छ ठेवणे होतंय कठीण, येतेय दुर्गंधी? 'या' टिप्सने आरशासारखं चमकेल

Aug 03, 2024 02:01 PM IST

Bathroom cleaning Tips In Marathi: वास्तविक, लोक सहसा आठवड्यातून किंवा दोन आठवड्यातून एकदा बाथरूम स्वच्छ करतात. बरेच लोक महिन्यातून एकदाच बाथरूम स्वच्छ करतात. त्यामुळे बाथरूमची साफसफाई करणे त्यांच्यासाठी कष्टाचे आणि वेळखाऊ काम बनते.

Bathroom cleaning Tips In Marathi
Bathroom cleaning Tips In Marathi (shutterstock)

Bathroom cleaning Tips: बाथरुम साफ करणे हे घरातील इतर भाग स्वच्छ करण्यापेक्षा जास्त कठीण आणि वेळखाऊ काम आहे. याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? वास्तविक, लोक सहसा आठवड्यातून किंवा दोन आठवड्यातून एकदा बाथरूम स्वच्छ करतात. बरेच लोक महिन्यातून एकदाच बाथरूम स्वच्छ करतात. त्यामुळे बाथरूमची साफसफाई करणे त्यांच्यासाठी कष्टाचे आणि वेळखाऊ काम बनते. पण जर तुम्ही दररोज फक्त 5 मिनिटे बाथरूम स्वच्छ कराल,. तर त्यामुळे तुमचे संपूर्ण बाथरूम केवळ चमकणारच नाही तर दररोज चांगला वाससुद्धा येईल. फक्त तुम्हाला या टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे.

सफाईसाठी जबरदस्त लिक्विड-

दररोज बाथरूमची स्वच्छता फक्त पाच मिनिटांत करता येते. त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ देण्याची अजिबात गरज नाही. फक्त हा उपाय करणे गरजेचे आहे. तुम्हाला एक लिक्विड तयार करून ठेवावे लागेल. जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ घालवायला लागणार नाही. हे लिक्विड तयार करण्यासाठी, पाण्यात डिटर्जंट घाला आणि त्यासोबतच बेकिंग सोडादेखील घाला. फक्त हे मिश्रण एकजीव करा आणि स्प्रे बाटलीत भरून ठेवा.

टॉयलेट सीट ब्रशने स्वच्छ करा-

दररोज बाथरूमची स्वच्छता करण्यासाठी एक ब्रश ठेवा. तयार केलेले लिक्विड फक्त टॉयलेट सीटवर ओता आणि ब्रशने घासून घ्या. त्यानंतर ते फ्लश करा. अशाने टॉयलेट सीट अगदी लक्ख निघेल.

अशा प्रकारे बाथरूमच्या भिंती स्वच्छ करा-

बाथरूमच्या संपूर्ण भिंती स्वच्छ करण्यासाठी, स्प्रे बाटलीने त्या तयार लिक्विडची फवारणी करा आणि टिश्यू पेपरच्या मदतीने पुसून टाका. त्यामुळे भिंतींवर साचलेला साबण आणि पाणी स्वच्छ होते. आणि दररोज हे केल्याने भिंती अगदी चमकू लागतात.

रॅक आणि स्टॅन्ड स्वच्छ करा

दररोज साफसफाई करताना, शॅम्पू आणि साबण ठेवणारे सर्व स्टँड टिश्यू पेपरने पुसून टाका आणि हा टिश्यू पेपर फेकून द्या. यामुळे कपडे घाण होण्याचा आणि पुन्हा पुन्हा साफ करण्याचा त्रास दूर होईल. यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि बाथरूमधील साहित्यही नीटनेटके राहील.

बाथरूमची फरशी अशाप्रकारे स्वच्छ करा

अनेकदा कपडे धुताना बाथरूममध्ये खूप साबणाचा फेस येतो. ब्रशच्या साहाय्याने हा फेस सर्वत्र पसरवा आणि घासून घ्या. विशेषत: नळ आणि पाण्याचा निचरा होण्याऱ्या भागात पाणी साचल्याने पिवळसरपणा दिसू लागतो. या पद्धतींनी तुम्ही दररोज काही मिनिटांत बाथरूम स्वच्छ करू शकाल. दररोज हा उपाय केल्याने बाथरूम अगदी आरशासारखे चमकत राहील. तसेच दुर्गंधही येणार नाही.