Various names of Radha: कृष्ण जन्माष्टमीच्या १५ दिवसांनंतर राधारानीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी राधारानीचा जन्मोत्सव फारच खास असतो. यादरम्यान, जर घरात सुंदर कन्या जन्माला आली तर फारच उत्तम असते. याकाळात जन्मलेल्या मुलींसाठी राधारणीच्या मंत्रामधून सुंदर नाव तुम्ही निवडू शकता. ही सुंदर नावे तुमच्या मुलीसाठी आधुनिक आणि पारंपारिक दोन्ही प्रकारे चांगली दिसतील. शिवाय आयुष्यभर या मुलींवर राधेसोबतच श्रीकृष्णाची कृपादृष्टीसुद्धा राहील.
राधा- राधारणीची ही नावे कधीच जुनी होत नाहीत. त्यामुळेच हे सुंदर नाव तुम्ही लेकीसाठी निवडू शकता.
रासेश्वरी- राधेचेच एक सुंदर नाव आहे.
राम्या- हे नाव राधेच्या ३२ नावांपैकी एक नाव आहे.
सर्वज्ञा- जिला सर्वकाही माहिती आहे किंवा ज्ञात आहे. हेसुद्धा राधारानीचे सुंदर नाव आहे.
वृंदा- वृंदावन विहारिणी राधारणीचे हेसुद्धा एक सुंदर नाव आहे.
रमा- राधाच्या ३२ नावांपैकी एक नाव आहे.
सत्या- सत्या हे नावही राधाजींचेच एक नाव आहे.
ईश्वरी- ईश्वरी हे नावदेखील राधाच्या ३२ नावांच्या मंत्रातून निवडलेले आहे.
गांधर्वी- हेसुद्धा राधारणीच्या मंत्रातून निवडलेले एक नाव आहे. हे तुमच्या मुलीसाठी चांगले राहील.
राधिका- राधेचे एक प्रेमळ नाव
रुक्मिणी- श्रीकृष्णाच्या पत्नीचे रूप.
पूर्णा- जे खऱ्या अर्थाने पूर्णपणे पूर्ण आहे.
अमोहा- जिला कोणत्याही गोष्टीचा मोह नाही.
अनुत्तरा- जिला काहीच तोड नाही.
रिद्धिका- आयुष्यात यशस्वी असणारी.
गौरांगी- गोऱ्या रंगाची
ह्रदया- मनात घर करणारी.
विलासिनी- ऐषोरामात जगणारी इतरांना मदत करणारी.