Nutritious food for 6 to 12 month old babies: तज्ज्ञांच्या मते, जेव्हा बाळ ६ महिन्यांचे होते, तेव्हा त्याला घन आहार देणे सुरू केले जाते. यावेळी,मुलांचा शारीरिक विकास होत असतो. म्हणून त्याच्या आहारात शक्य तितक्या पोषक तत्वांचा समावेश करणे आवश्यक असते. परंतु अनेकांना आपल्या लहान बाळांना काय खाऊ घालावे हेच कळत नाही. यासाठीच आज आपण एक पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत. शिवाय जर तुमचे बाळ अगदीच बारीक किंवा अशक्त असेल किंवा तुम्हाला त्याचे वजन वाढवायचे असेल तर ही बेबी फूड रेसिपी तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरेल.
-एक वाटी नाचणी
-अर्धी वाटी लाल तांदूळ
-अर्धी वाटी साधे तांदूळ
-अर्धी वाटी ओटमील
-अर्धी वाटी मसूर डाळ
-अर्धी वाटी मूग डाळ
-६ बदाम
-६ काजू
-६ वेलची
-सर्वप्रथम, नाचणी पाण्याने नीट धुवून घ्या.
-तांदूळ आणि डाळी एकत्र करून स्वच्छ पाण्याने धुवा.
-आता एक स्वच्छ सुती कापड घेऊन त्यावर नाचणी टाका आणि एक ते दोन तास वाळायला ठेवा.
-डाळी, तांदूळ आणि यांचे मिश्रणही अशा प्रकारेच कोरडे करा.
-नाचणी कोरडी झाली की, एका कढईत ५ मिनिटे भाजून घ्या.
-यानंतर, दुसरे मिश्रणदेखील त्याच प्रकारे भाजून घ्या.
-नंतर कढईत काजू, बदाम आणि वेलची घालून भाजून घ्या.
-या तिन्ही गोष्टी मिक्स करा आणि १५ मिनिटे थंड होऊ द्या.
-आता मिक्सरमध्ये बारीक करून पावडर बनवा. नंतर ते चाळून एका डब्यात भरून ठेवा.
-एका भांड्यात दोन चमचे तयार केलेली ही पावडर घाला.
-नंतर त्यात अर्धी वाटी पाणी घालून नीट ढवळून घ्यावे. गुठळी होऊ देऊ नका.
-आता गॅसवर एक भांडे ठेवा आणि त्यात हे मिश्रण घाला आणि सतत ढवळत राहा.
तुम्हाला ते मंद ते मध्यम आचेवर शिजवायचे आहे.
-थोडे घट्ट झाल्यावर त्यात एक चमचा साजूक तूप घाला.
-यानंतर, हे मिश्रण एका भांड्यात घाला.
-चवीसाठी तुम्ही त्यात केळी, खजूर सरबत किंवा गूळ बारकी करून घालू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)