Baby Care Tips: लहान बाळासोबत बाहेर जाताय का? डायपर बॅग मध्ये नक्की ठेवा 'या' गोष्टी-baby care tips you must keep these things in baby diaper bag ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Baby Care Tips: लहान बाळासोबत बाहेर जाताय का? डायपर बॅग मध्ये नक्की ठेवा 'या' गोष्टी

Baby Care Tips: लहान बाळासोबत बाहेर जाताय का? डायपर बॅग मध्ये नक्की ठेवा 'या' गोष्टी

Aug 07, 2024 11:18 PM IST

Baby Care Tips in Marathi: जर तुम्ही नुकतेच पालक झाले असाल तर घराबाहेर पडण्यापूर्वी डायपर बॅग तयार करावी लागेल. पण डायपर बॅगमध्ये कोणत्या गोष्टी ठेवाव्यात हे तुम्हाला माहित आहे का?

बाळाच्या डायपर बॅग मध्ये ठेवाव्या या गोष्टी
बाळाच्या डायपर बॅग मध्ये ठेवाव्या या गोष्टी (freepik)

Things to Keep in Baby Diaper Bag: बाळाला कुठेही बाहेर नेण्याआधी त्याच्यासाठी डायपर बॅग तयार करणं गरजेचं आहे. पण बाळाच्या डायपर बॅगमध्ये काय ठेवावे याबाबत काही लोक संभ्रमात असतात. बाळाच्या डायपर बॅगमध्ये काय ठेवायचे हे तुम्ही कुठे जात आहात, हवामान कसे आहे आणि किती वेळ बाहेर असाल यावर अवलंबून असते. मात्र या बॅगेत काही गोष्टी असायला हव्यात. कुठेही बाहेर जाताना बाळाच्या डायपर बॅगमध्ये या गोष्टी ठेवायला अजिबात विसरू नका. जाणून घ्या काय आहेत त्या गोष्टी

बाळाच्या डायपर बॅगमध्ये काय ठेवावे

१. सॅनिटायझर - जिथे जाल तिथे हात धुण्यासाठी जागा मिळेलच असे नाही. त्यामुळे आपले हात बॅक्टेरियामुक्त होण्यासाठी हँड सॅनिटायझर बॅगमध्ये ठेवा.

२. बाळासाठी कपडे - आपल्या मुलासाठी एक किंवा दोन कपडे ठेवा. जर तुम्ही नुकत्याच जन्मलेल्या बाळासोबत कुठेतरी जात असाल तर तुम्ही तुमच्या बाळासाठी मोजे, टोपी आणि हातमोजे यांची अतिरिक्त जोडी ठेवावी.

३. हँकीज - जर मुलाचे हात आणि चेहरा घाणेरडा झाला असेल तर ते पुसण्यासाठी रुमाल आणि टिश्यू ठेवा. एक्स्ट्रा रुमाल नक्की ठेवा.

४. बेबी डायपर - काही अतिरिक्त बेबी डायपर ठेवा. कारण कधी कधी बाळाचे डायपर बदलण्याची गरज कधी पडेल हे सांगता येत नाही.

५. वेट वाइप्स - डायपर बदलण्यापूर्वी बाळाला पुसण्यासाठी वेट वाइप्स आवश्यक आहेत. त्यामुळे वेट वाइप्सचा लहान पॅकेट नेहमी बॅगमध्ये ठेवा.

६. बेबी फूड - फॉर्म्युला मिल्क किंवा सेरेलॅक सोबत ठेवा. जर मुलाने खाणे-पिणे सुरू केले असेल तर त्याच्यासाठी काही तरी अन्न ठेवा. जर आपण आपल्या बाळाला स्तनपान देत असाल तर आपण फक्त स्वत: साठी पाण्याची बॉटल आणि काही हेल्दी स्नॅक्स ठेवले पाहिजेत.

७. बेबी वॉटर बॉटल - जर तुमचे मूल अन्न खात असेल तर पाण्याची बॉटल सोबत ठेवा. बाळासाठी वेगळी पाण्याची बॉटल सोबत ठेवावी.

८. खेळणी - तुम्ही कुठेही गेलात तरी आपल्या मुलासाठी एक-दोन आवडती खेळणी घेऊन जा.

९. बेबी ब्लँकेट - डायपर बॅगमध्ये बेबी ब्लँकेट असावे. मोठे नसले तरी छोट्या साइजचे बेबी ब्लँकेट सोबत ठेवावे.

१०. अँटी रॅश क्रीम - आपल्या मुलाला पुरळमुक्त ठेवण्यासाठी अँटी-रॅश क्रीमचा वापर करा. ही क्रीम नेहमी सोबत ठेवा. यासोबत तुम्ही बेबी मॉइश्चरायझर सुद्धा ठेवू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)