Baby Care Tips: कांगारू मदर केअर म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे आणि का आहे गरज
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Baby Care Tips: कांगारू मदर केअर म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे आणि का आहे गरज

Baby Care Tips: कांगारू मदर केअर म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे आणि का आहे गरज

Published Sep 24, 2024 10:39 PM IST

Kangaroo Mother Care Benefits: प्रीमॅच्युअर डिलिव्हरीने जन्मलेल्या नवजात अर्भकाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी डॉक्टर 'कांगारू मदर केअर'ची मदत घेतात. जाणून घेऊया काय आहे 'कांगारू मदर केअर' आणि त्याचे फायदे काय आहेत.

कांगारू मदर केअर
कांगारू मदर केअर (shutterstock)

How Kangaroo Mother Care Helps to Mother and Baby: नवजात बाळाचा जन्म होताच आईचे संपूर्ण आयुष्यच बदलते. गरोदरपणाप्रमाणेच जन्मानंतरही बाळाची चांगली काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ अनेकदा नव्या मातांना देतात. हे करताना थोडासा निष्काळजीपणा बाळाला अनेक प्रकारच्या आजारांना बळी पाडू शकतो. विशेषत: प्रीमॅच्युअर डिलेव्हरी झालेल्या बाळांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या असतात. नवजात बालकाच्या पोषणविषयक गरजा भागविण्यासाठी आईचे दूध अत्यंत आवश्यक आहे. परंतु अकाली प्रसूतीमुळे आईच्या स्तनांमध्ये दूध तयार होत नाही. अशी मुले ना दुधाचे योग्य प्रकारे सेवन करू शकतात ना आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले राहू शकतात. अशावेळी अकाली प्रसूतीतून जन्माला आलेल्या नवजात बाळाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी डॉक्टर 'कांगारू मदर केअर'ची मदत घेतात. जाणून घेऊया काय आहे 'कांगारू मदर केअर' आणि त्याचे फायदे काय आहेत.

'कांगारू मदर केअर' म्हणजे काय?

'कांगारू मदर केअर' हा नैसर्गिक उपाय आहे. यात मादी कांगारूप्रमाणे आई आपल्या मुलाला छातीजवळ धरते. या वैद्यकीय पद्धतीला इंग्रजीत स्किन-टू-स्किन कॉन्टॅक्ट म्हणतात. या वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये आईशी त्वचेपासून त्वचेपर्यंत संपर्क साधल्याने नवजात अर्भकाच्या शरीराचे तापमान योग्य राहण्यास मदत होते. नॉर्मल डिलिव्हरीच्या तुलनेत प्रीमॅच्युअर डिलेव्हरीने जन्मलेल्या मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असते आणि वजनही कमी होते. यावर मात करण्यासाठी डॉक्टरांच्या देखरेखीखाली 'कांगारू मदर केअर'ची मदत घेतली जाते.

कोणाला दिली जाते कांगारू मदर केअर?

अंडर वेट आणि प्रीमॅच्युअर डिलीव्हरीमुळे जन्मलेल्या बाळाला आरोग्याच्या अनेक समस्यांचा धोका असतो. या समस्यांपासून मुलाला वाचवण्यासाठी त्याला 'कांगारू मदर केअर'ची मदत दिली जाते. प्रीमॅच्युअर डिलीव्हरीनंतर लवकरात लवकर 'कांगारू मदर केअर' द्यावी. 'कांगारू मदर केअर' दररोज डॉक्टरांच्या देखरेखीखाली ८ तास किंवा त्याहून अधिक काळ करावी लागू शकते.

कांगारू मदर केअरचे फायदे

- आई बाळाला दीर्घकाळ स्तनपान देऊ शकते.

- बाळ स्तनपान करायला शिकते.

- बाळाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले विकसित होते.

- बाळ रोग आणि संसर्गापासून सुरक्षित राहते.

- आईला मानसिक सुख मिळते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner