Side effects of plastic bottles: बहुतांश लोक आपल्या मुलांना प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये दूध किंवा पाणी देतात. तर, असे करणे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. लहान मुलांना प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये दूध पाजले जाते हे तुम्ही पाहिलेच असेल. असे बरेच लोक आहेत जे पॅकिंगमधील दूध गरम करतात आणि प्लास्टिकच्या बाटलीत ठेवतात. त्यानंतर मुलं हे दूध पितात. जे पालक आपल्या मुलांना प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये दूध पाजतात त्यापैकी तुम्हीही एक आहात का? जर होय, तर हा लेख नक्कीच वाचा.
डॉक्टरांच्या मते, मुलांना प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये दूध पाजल्याने त्यांच्या आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचते. प्लास्टिकच्या बाटल्यांमधील दूध प्यायल्याने तुमचे मुल मायक्रोप्लास्टिकच्या संपर्कात येते. जेव्हा आपण प्लास्टिकच्या बाटलीत गरम दूध किंवा पाणी ओततो तेव्हा बाटलीतून शेकडो मायक्रोप्लास्टिक बाहेर पडतात. जे मुलांच्या पोटात जाऊ शकतात. कधीकधी याचा परिणाम मुलांच्या मेंदूवरही होतो. काही प्रकरणांमध्ये, याचा मुलांच्या विकासावरही परिणाम होऊ शकतो.
अमेरिकन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या मते, प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर अजिबात करू नये. तुम्हाला तुमच्या मुलाला सुरक्षित ठेवायचे असेल, तर प्लास्टिकच्या बाटलीत दूध देण्याऐवजी स्टील किंवा ग्लासमध्ये दूध द्यावे. यासाठी तुम्ही त्यांना एका ग्लासमध्ये फॉर्म्युला दूध देऊ शकता.
-प्लास्टिकच्या संपर्कात येणाऱ्या मुलांना अनेक तोटे होऊ शकतात.
-त्यामुळे मुलांच्या शारीरिक विकासात अडथळा निर्माण होतो.
-त्यामुळे त्यांना पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
-प्लॅस्टिकच्या संपर्कात आल्याने मुलांची रोग प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)