Dr Ambedkar Jayanti 2025 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १५ प्रेरणादायी विचार; जे वाचून अभिमान वाटेल
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dr Ambedkar Jayanti 2025 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १५ प्रेरणादायी विचार; जे वाचून अभिमान वाटेल

Dr Ambedkar Jayanti 2025 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १५ प्रेरणादायी विचार; जे वाचून अभिमान वाटेल

Published Apr 14, 2025 01:41 PM IST

Dr. Babasaheb Ambedkar Birth Anniversary : भारतीय राज्यघटनेचे शिल्पाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संघर्षातून उभारलं. त्यांचे हे मोलाचे १५ प्रभावशाली सुविचार..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर

Dr Ambedkar Jayanti 2025 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्तृत्व सूर्यासारखे प्रखर आणि तेजस्वी आहे. अफाट ज्ञान, मेहनत आणि संघर्षाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार बनले. १४ एप्रिल हा डॉ. बाबासाहेबांचा जन्मदिवस. १८९१ साली महू येथे त्यांचा जन्म झाला. गौतम बुद्ध, कबीर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सारख्या महान विभूतींचे विचार आत्मसात करून सामाजिक क्रांतीचे प्रणेते बनलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म युग व काळाचा प्रवाह उलट दिशेला बळवण्यासाठी झाला होता. त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व समजण्यासाठी एखाद्या विद्वानालाही वर्षोनुवर्षो लागू शकतात. कारण त्यांच्या व्यक्तीमत्वाचा थांग लागणे अवघड काम आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संघर्षातून उभारलं. त्यांचे हे मोलाचे १५ प्रभावशाली सुविचार...

1. जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे. अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.

2. आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?

3. धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल, तर तो बुद्धीनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धीनिष्ठ हेच होय.

4. लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.

5. विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याची विचार केला पाहिजे.

6. लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.

7. अन्यायाविरूद्ध लढणाच्या ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनलं पाहिजे.

8. शीला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे. शिका, संघठित व्हा व संघर्ष करा.

9. माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.

10. तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.

11. इतिहास विसरू नका, नाहीतर तो तुम्हाला पुन्हा एकदा गुलाम बनवेल.

12. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवणारा धर्म मला आवडतो."

13. स्वतंत्रता म्हणजे काय हे ज्याला कळले नाही, त्याला गुलामगिरीशिवाय पर्याय नाही."

14. शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे, ज्यांनी पिले तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही"

15. एकसंध अखंड आधुनिक भारत हवा असेल तर सर्व धर्मांच्या धर्मग्रंथांचे सार्वभौमत्व संपुष्टात आले पाहिजे.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner