BP symptoms: तुम्हालाही आहे का उच्च रक्तदाब, कसे ओळखावे? काय असतात लक्षणे?-b p what are the exact symptoms of high blood pressure ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  BP symptoms: तुम्हालाही आहे का उच्च रक्तदाब, कसे ओळखावे? काय असतात लक्षणे?

BP symptoms: तुम्हालाही आहे का उच्च रक्तदाब, कसे ओळखावे? काय असतात लक्षणे?

Aug 18, 2024 10:39 AM IST

symptoms of high blood pressure: सकाळी रक्तदाब चेक करणे खूप महत्वाचे आहे. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याविषयी माहिती मिळते.

symptoms of high BP
symptoms of high BP

symptoms of high BP: उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तदाबाची काही मूक लक्षणे आहेत. ज्याबद्दल बहुतांश लोकांना माहिती नसते. आणि ते आरोग्याला हानी पोहोचवत असतात. म्हणूनच उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर असेही म्हणतात. सकाळी रक्तदाब चेक करणे खूप महत्वाचे आहे. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याविषयी माहिती मिळते. जर एखाद्याला हायपरटेन्शन असेल आणि अशी लक्षणे सकाळी दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी हे महत्त्वाचे आहे. अशी लक्षणे सकाळी दिसल्यास तातडीने बीपी तपासणे आवश्यक आहे.

उच्च रक्तदाबाच्याबाबतीत सकाळी शरीरात अशी लक्षणे दिसतात-

सकाळी डोकेदुखी-

जर झोपेतून उठल्यानंतरही डोकेदुखी होत असेल तर त्याचे कारण म्हणजे उच्च रक्तदाब असू शकते. उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या ताणल्या जातात. त्यामुळे डोकेदुखी सुरू होते.

अचानक नाकातून रक्तस्त्राव-

कोणत्याही कारणाशिवाय नाकातून अचानक रक्त पडत असेल तर ते उच्च रक्तदाबाचे लक्षण आहे. उच्च रक्तदाबामुळे नाकातील नाजूक रक्तवाहिन्या जखमी होतात आणि नाकातून रक्त पडू लागते.

सकाळी देखील थकवा जाणवणे-

जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतरही थकवा जाणवत असेल, तर हे उच्च रक्तदाबाचे लक्षण आहे, ज्यामुळे ऊर्जा पातळी प्रभावित होते.

अस्वस्थ वाटणे-

उच्च रक्तदाबामुळे, एखाद्याला सकाळी अस्वस्थता जाणवते.

सकाळी चक्कर येणे-

झोपेतून उठल्यानंतर चक्कर येणे हे रक्तदाबातील चढउतारांमुळे होते.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग