Ayurvedic Home Remedy for Sore Throat and Cough: जसजसे हवामान बदलते तसतसे घसा खवखवणे, खोकला यासारख्या समस्या वाढू लागतात. या ऋतूत कधी पाऊस तर कधी उन्हामुळे आरोग्य बिघडण्याचा धोका जास्त असतो. या समस्यांना सामोरे जाण्यासाठी लोक अँटीबायोटिक्सचा वापर करतात, जे प्रत्येक वेळी करणे योग्य नाही. अशावेळी काही आयुर्वेदिक पद्धतींचा अवलंब केल्यास घसा खवखवणे किंवा खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांच्या नुसार घसा खवखवणे, सर्दी, कफ, पचन यासारख्या समस्यांचा सामना करण्यासाठी ३ गोष्टींचा वापर केला जातो, ज्याला त्रिकतू म्हणतात. ज्यात त्रि-म्हणजे तीन आणि कतू- म्हणजे उष्ण आणि तिखट असलेल्या औषधी वनस्पती असतात.
हे मिश्रण बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळतात. ज्यामध्ये पहिली म्हणजे मारिच म्हणजेच काळी मिरी. दुसरा घटक म्हणजे पिपली म्हणजेच लांब काळी मिरी आणि शुण्ठी म्हणजे सुंठ किंवा कोरडे आले.
यामुळे भूक वाढते. तसेच एंझाइम्स तयार करण्यासाठी पोटाला उत्तेजित करते. अशावेळी पचनक्रियेत मदत होते.
हे श्वसन संस्थेसाठी सुद्धा खूप चांगले आहे. यामुळे खोकला, सर्दी, दमा, एलर्जिक राइनाइटिस सारख्या समस्यांना सामोरे जाण्यास मदत होते.
याच्या वापराने चरबी बर्न होते आणि कोलेस्टेरॉलही कमी होते, असे तज्ज्ञांनी सांगितले. याशिवाय थायरॉईड पासून घसा खवखवणे आणि टॉन्सिलायटीस सारख्या घशाच्या आजारांमध्ये हे फायदेशीर आहे.
तज्ज्ञांच्या मते, ही पावडर एका दिवसात ५०० मिलीग्राम ते ३ ग्रॅम पर्यंत घेता येते. जेवण केल्यानंतर हे खाणे चांगले मानले जाते. त्रिकटू चूर्ण मध किंवा पाण्यात मिसळून खाता येते. एखाद्याला त्याची चव खूप तिखट वाटत असेल तर तो जेवणात घालू शकतो.
या मिश्रणात तीन गोष्टी वापरण्यात आल्या आहेत. अशावेळी त्रिकटूचा प्रभाव उष्ण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे मिश्रण घ्यायचे असेल तर प्रथम आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)