मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ayurveda Tips: छातीत जमा झालेला कफ आणि खोकला दूर करेल हा आयुर्वेदिक आल्याचा काढा, ही आहे बनवण्याची योग्य पद्धत

Ayurveda Tips: छातीत जमा झालेला कफ आणि खोकला दूर करेल हा आयुर्वेदिक आल्याचा काढा, ही आहे बनवण्याची योग्य पद्धत

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 18, 2024 11:26 AM IST

Flu and Chest Congestion: थंडीचा जोर वाढला तसे सर्दी, खोकला, कफची समस्या सुद्धा वाढत आहे. तुम्हाला सुद्धा याचा त्रास होत असेल तर घरी हा आयुर्वेदिक काढा बनवून प्या, आराम मिळेल.

आयुर्वेदिक आल्याचा काढा
आयुर्वेदिक आल्याचा काढा (freepik)

Tips to Make Ayurvedic Ginger Kadha: हिवाळ्यात सर्दी आणि खोकल्याबरोबरच छातीत कफ जमा होण्याच्या समस्येने अनेकांना त्रास होऊ लागतो. त्यामुळे अनेक वेळा त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो आणि फुफ्फुसात संसर्ग आणि न्यूमोनिया सारख्या समस्या देखील उद्भवू लागतात. राज्यात पुन्हा थंडी वाढली आहेत. त्यामुळे या समस्या सुद्धा वाढत आहे. या समस्या अशा लोकांना त्रास देतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे. जर तुम्हाला सुद्धा छातील कफ जमा झाल्याने त्रास होत असेल, तर हा आयुर्वेदिक आल्याचा काढा तुमची समस्या दूर करण्यात मदत करू शकतो. ते कसे बनवायचे आणि त्याचे फायदे जाणून घ्या.

या आयुर्वेदिक काढ्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आले असल्याचे न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस तज्ज्ञ वरुण कात्याल सांगतात. एखाद्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढवून, आले त्याला सर्दी आणि खोकल्यासारख्या हंगामी संसर्गापासून दूर ठेवण्यास मदत करते. हिवाळ्यात तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही थेट आल्याचे सेवन करू शकता. आल्याचे सेवन केल्याने घसादुखी आणि सर्दीपासून आराम मिळतो. सर्दी आणि फ्लू झाल्यास आल्याचे सेवन करा. ते तुमच्या फुफ्फुसात उष्णता निर्माण करून जमा झालेले कफ वितळण्यास मदत करू शकते.

आल्याचा काढा बनवण्याची पद्धत

आल्याचा काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात एक ग्लास पाणी टाकून त्यात काळी मिरी, तुळशीची पाने, एक मोठे तमालपत्र, कच्च्या हळदीचा एक छोटा तुकडा, दालचिनीची काडी, गूळ आणि आले घालून उकळा. हे साधारण २० मिनिटे उकळू द्या. जेव्हा काढ्याच्या पाण्याचा रंग बदलून ते अर्धे होईल तेव्हा ते एका ग्लासमध्ये गाळून प्या. फक्त गरम काढ्याचे सेवन करावे लागेल याची विशेष काळजी घ्या.

 

आल्याच्या काढ्याचे फायदे

काढ्यामध्ये असलेल्या हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामध्ये असलेले कर्क्युमिन नावाचे संयुग कफ पातळ करण्यास मदत करते. तर आल्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म संसर्गाशी लढा देऊन कफ आणि श्लेष्माची समस्या दूर करण्यास मदत करतात. काळी मिरी सर्दी आणि खोकल्याच्या उपचारात फायदेशीर आहे आणि फुफ्फुसांमध्ये जमा झालेला श्लेष्मा कमी करण्यास मदत करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel