मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ayurveda Tips: उन्हाळ्यात वेट लॉससाठी फॉलो करा एक्सपर्टने सांगितलेली पद्धत, लगेच दिसेल फरक

Ayurveda Tips: उन्हाळ्यात वेट लॉससाठी फॉलो करा एक्सपर्टने सांगितलेली पद्धत, लगेच दिसेल फरक

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 28, 2023 01:21 PM IST

Weight Loss Drink: जर तुम्ही उन्हाळ्यात वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर आयुर्वेदिक तज्ञांनी सुचवलेली ही खात्रीशीर पद्धत तुम्ही अवलंबू शकता. येथे पहा वजन कमी करण्याचा सोपा उपाय

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी ड्रिंक
उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी ड्रिंक (HT)

Weight Loss In Summer: आज जगभरात लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. खराब जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी वजन वाढण्यास कारणीभूत आहेत. लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. व्यायाम आणि आहार नियंत्रणानंतरही लोकांना सकारात्मक परिणाम मिळत नाही. उन्हाळा सुरू झाला असून या काळात तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तज्ज्ञांनी सुचवलेल्या पद्धतीचा अवलंब करू शकता. वास्तविक आयुर्वेदिक तज्ञ दीक्षा भावसार यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे उन्हाळ्यासाठी वजन कमी करण्याच्या ड्रिंक्सबद्दल सांगितले आहे. हे ड्रिंक्स काय आहे आणि ते कसे तयार करावे हे जाणून घ्या.

हे ड्रिंक कसे बनवायचे

- एक कप कोमट पाणी घ्या.

- नंतर त्यात सब्जाच्या बिया घाला.

- अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्या.

- एक चमचा मध घाला आणि नंतर चांगले मिक्स करा.

- वेट लॉस ड्रिंक तयार आहे. ते घोट घोट करुन प्या.

या ड्रिंकमध्ये असलेल्या घटकांचे फायदे

सब्जा

अल्फा-लिनोलेनिक अॅसिडमध्ये समृद्ध, सब्जाच्या बिया शरीरात फॅट बर्न करणारे चयापचय वाढवतात. सब्जाच्या बियांमध्ये असलेले फायबर शरीरातील चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करून चरबी कमी करण्यास प्रोत्साहन देते.

लिंबू

हे पचायला खूप सोपे आहे. ते चवीला आंबट आणि प्रभावाने गरम असते. हे भूक चयापचय सुधारते आणि तहान देखील कमी करते. यासह ते लिव्हर डिटॉक्स करण्यास मदत करते आणि जळजळ कमी करते. फॅट बर्निंग गुणधर्मांसोबतच त्यात व्हिटॅमिन सी, फोलेट, थायामिन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते.

मध

हे एक उत्तम फॅट बर्नर आहे. हे चवीला गोड आहे, त्यामुळे गोड खायची क्रेविंग दूर ठेवते. हे शरीरातील अतिरिक्त चरबी आणि खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकून वजन सहजतेने कमी करण्यास मदत करते.

हे ड्रिंक कधी प्यावे

उन्हाळ्यात हे ड्रिंक पिण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळी लवकर रिकाम्या पोटी. यासबोतच तुम्ही जेवणाच्या एक तास आधी ते पिऊ शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel