मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ayodhya Air Ticket Sale: अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विमान कंपनीची खास ऑफर, अजिबात चुकवू नका!

Ayodhya Air Ticket Sale: अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विमान कंपनीची खास ऑफर, अजिबात चुकवू नका!

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 22, 2024 01:41 PM IST

Ayodhya Pran Pratishtha Ceremony: आयोध्या येथील श्री राम मंदिराच्या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून स्पाईसजेटने खास ऑफरची घोषणा केली आहे. जाणून घ्या या ऑफरबद्दल सविस्तर.

अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी स्पाइसजेटची ऑफर
अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी स्पाइसजेटची ऑफर (HT)

SpiceJet Ayodhya Air Ticket Sale: श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने स्पाईसजेटने एक खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही भारतातील कोणत्याही शहरातून अयोध्याला फक्त १६२२ रुपयात जाऊ शकता. हे भाडे सर्वसमावेश असून मुंबई-गोवा, दिल्ली-जयपूर आणि गुवाहाटी-बागडोगरा या देशांतर्गत मार्गांवर लागू आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही २२ ते २८ जानेवारी दरम्यान तुमची बुकिंग करू शकता. तर तुमचा प्रवास कालावधी २२ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान असावे. काही ब्लॅकआउट तारखांना या ऑफरचा लाभ घेता येणार नाही, हे लक्षात ठेवा.

स्पाईसजेटने अयोध्याला जोडण्यासाठी नवीन फ्लाइट्स देखील सुरू केल्या आहेत. १ फेब्रुवारी २०२४ पासून स्पाईसजेट दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, बेंगळुरू, जयपूर, पाटणा, दरभंगा आणि मुंबई येथून अयोध्यासाठी नॉन-स्टॉप फ्लाइट्स सुरू करणार आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही डोमॅस्टिक आणि आंतरराष्ट्रीय डायरेक्ट वन वे फ्लाइटसाठी फक्त १६२२ रुपयात प्रवास करू शकता. यामध्ये स्पाईसमॅक्स, You 1st आणि पसंती सीट्सवर ३० टक्क्यांपर्यंत सवलत देखील मिळत आहे, अशी माहिती स्पाईसजेटचे चीफ कमर्शियल ऑफिसर शिल्पा भाटिया यांनी दिली.

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही स्पाईसजेटची वेबसाइट, एम-साईट, मोबाईल अॅप किंवा निवडक ट्रॅव्हल एजंट्सकडून बुकिंग करू शकता. यासोबतच या ऑफर अंतर्गत केलेल्या बुकिंगसाठी फ्री डेट चेंज ऑफरचा लाभ घेऊ शकतात. याचा लाभ तुम्ही फ्लाइट प्रस्थान वेळेच्या किमान ९६ तास आधी घेऊ शकता. तर तुम्हीही अयोध्याला भेट देण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तर ही तुमच्यासाठी योग्य वेळ आहे. आजच स्पाईसजेटची बुकिंग करा आणि अविस्मरणीय प्रवासाचा आनंद घ्या!

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel