मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  ऑफिसमध्ये काम करताना या विचित्र गोष्टी करणं टाळा; बॉस आणि सहकारी होतील नाराज

ऑफिसमध्ये काम करताना या विचित्र गोष्टी करणं टाळा; बॉस आणि सहकारी होतील नाराज

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 22, 2022 03:16 PM IST

Unprofessional Things In Workplace : ऑफिसमध्ये काम करत असताना नोकरदारांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायची गरज असते. नाही तर त्याचा विपरित परिणाम हा व्यक्तीच्या कामावर आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वावर होण्याची शक्यता असते.

Unprofessional Things In Workplace
Unprofessional Things In Workplace (HT)

Unprofessional Behavior In Office : अनेकांचं दररोजचं कामाचं ठिकाण म्हणजे ऑफिस. ऑफिसमध्ये आल्यानंतर लोकांचा संपर्क बॉस आणि इतर सहकाऱ्यांशी येत असल्यानं त्यांना तिथं चांगलं बोलणं आणि चांगलं वागणं अपेक्षित असतं. त्यामुळं काम करत असताना आणि ऑफिसमधील लोकांशी डिल करत असताना संभाषणाशिवाय अनेक गोष्टींची काळजी कर्मचाऱ्याला घ्यावी लागते, नाही तर त्याचे अनेक दुष्परिणाम हे त्याच्या व्यक्तिमत्त्वावर किंवा त्याच्या कामावर होत असतात. चला तर याबाबत जाणून घेऊयात.

ऑफिसमधील लोकांशी पर्सनल गोष्टी शेयर करू नका...

ऑफिसमधील संबंध हे औपचारिक असतात. त्यामुळं काम करत असताना किंवा तेथील सहकाऱ्यांशी बोलत असताना तिथं तुमच्या वैयक्तिक गोष्टी किंवा कुटुंबातील गोष्टी शेयर करणं टाळायला हवं. ही खुप वाईट सवय असून हे अव्यावसायिकपणाचं लक्षण आहे. कारण तुमच्या या गोष्टी ऐकून ऑफिसमधील लोकांना कंटाळा तर येईलच याशिवाय तुमच्याबद्दल इतरांमध्ये काही गैरसमज किंवा अफवा पसरण्याची शक्यता असते.

कामात प्रामाणिक रहा...

ऑफिसमधील कामात नेहमी प्रामाणिक असायला हवं. कामावर वेळेवर पोहचणे किंवा कामाशी काम ठेवल्यानं त्याचा तुमच्या ऑफिशियल व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक प्रभाव पडतो. याशिवाय लोक तुम्हाला महत्त्व द्यायला लागतात.

ऑफिसमध्ये इतरांशी उद्धटपणे वागू नका...

कामाच्या ठिकाणी बॉसबरोबर किंवा सहकाऱ्यांशी उद्धटपणे वागल्यास त्याचा वाईट परिणाम हा तुमच्या कामावर आणि एकूणच व्यक्तिमत्त्वावर होत असतो. त्यामुळं ऑफिसमध्ये काम करत असताना तुमचं वर्तन हे नेहमी नम्र आणि शांत असायला हवं.

कामात नेहमी सकारात्मक आणि क्रिएटिव्ह रहायला हवं...

ऑफिसमध्ये काम करत असताना तुम्ही नेहमी सकारात्मक, उत्साही आणि जोशपूर्ण असायला हवं. कारण कोणतीही कंपनी नेहमी सकारात्मक विचार करणाऱ्या कर्मचाऱ्याला नेहमीच प्राधान्य देत असते. त्यामुळं आपलं काम निट ठेवणं आणि टिमसोबत चांगलं कॉर्डिनेशन करणं फार गरजेचं असतं.

तुमच्या ऑफिस डेस्कवर स्वच्छता ठेवा...

ऑफिसमध्ये तुम्ही ज्या डेस्कवर काम करत असता त्याला नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवायला हवं. कारण तुम्ही कसे आहात आणि कसं काम करता हे तुमच्या डेस्कच्या स्थितीवरून कळत असतं. याशिवाय डेस्क स्वच्छ आणि आकर्षक असेल तर त्याचा सकारात्मक प्रभाव हा तुमच्या कामावरदेखील होतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या