Mistakes to Avoid to Improve Hair Growth Naturally: हिवाळा आपल्यासोबत केसांशी संबंधित अनेक समस्या घेऊन येतो. थंडींच्या दिवसात केसांची काळजी घेण्याशी संबंधित काही चुका केल्यास त्याच्या समस्या आणखी वाढतात. खरं तर तापमानात घट आणि आर्द्रता कमी झाल्यामुळे केसांमधून आवश्यक ओलावा हिरावून घेतला जाऊ शकतो. ज्यामुळे ते कोरडे होतात, कमकुवत होतात आणि तुटायला लागतात. जर तुम्हीही केसगळतीने त्रस्त असाल तर हिवाळ्यात केसांशी संबंधित या चुका करू नका. या चुका टाळल्या तर केस गळती थांबून केसांची वाढ होईल.
बरेच लोक केसांना तेल लावणे टाळतात. हे अजिबात करू नका. तापमानात घट आणि आर्द्रता कमी झाल्यामुळे केसांमधून आवश्यक ओलावा निघून जाऊ शकतो. त्यामुळे केस कोरडे, कमकुवत होतात आणि तुटणे सुरू होते. अशा परिस्थितीत केसांमध्ये आवश्यक आर्द्रता राखण्यासाठी आठवड्यातून दोनदा गरम तेलाने मसाज करा.
केसांना शॅम्पू करण्यापूर्वी नेहमी पाण्यात डायल्यूट करून वापरा. यासाठी एक भाग शॅम्पूमध्ये तीन भाग पाणी मिसळून केस धुवा. असे केल्याने केसांवर शॅम्पू कमी वापरला जातो, टाळू हायड्रेट राहते, त्यामुळे केस कमी कोरडे होतात. हे केसांवर जेंटल पद्धतीने काम करून केस पूर्णपणे स्वच्छ करण्यास मदत करते.
हिवाळ्यात बहुतेक लोक केस धुण्यासाठी खूप गरम पाण्याचा वापर करतात. असे केल्याने केसांचे नुकसान होऊ शकते. केस नेहमी थंड पाण्याने धुवावेत.
केसांवर ड्रायरचा जास्त वापर केल्याने तुमचे केस जळू शकतात. यामुळे केस खराब होतात अशा परिस्थितीत केसांवर ड्रायरचा वापर कमीत कमी करा.
तुमच्या त्वचेप्रमाणेच केसांचे आरोग्यही चांगले ठेवण्यासाठी त्यावर आठवड्यातून एकदा हेअर मास्क लावा. असे केल्याने टाळूचे आरोग्य चांगले राहते आणि केसांची मुळे मजबूत होतात, केस कमी कमकुवत होतात आणि मधूनच तुटतात. तसेच केसांचा गुंता जास्त होऊन तुटू लागतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या