Relationship Tips: या छोट्या चुकांमुळे बिघडते नाते, एंगेजमेट- लग्नाच्या मधील काळात करू नका या मिस्टेक
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Relationship Tips: या छोट्या चुकांमुळे बिघडते नाते, एंगेजमेट- लग्नाच्या मधील काळात करू नका या मिस्टेक

Relationship Tips: या छोट्या चुकांमुळे बिघडते नाते, एंगेजमेट- लग्नाच्या मधील काळात करू नका या मिस्टेक

Published Dec 01, 2023 11:18 PM IST

Gap Between Engagement and Marriage: जर तुमची एंगेजमेंट झाली असेल आणि लग्नाला जास्त गॅप असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. कारण एक छोटीशी चूक तुमचे नाते संपवू शकते.

रिलेशनशिप टिप्स
रिलेशनशिप टिप्स (unsplash)

Mistakes to Avoid During Courtship Period: लग्न हे दोन व्यक्तींना जोडणारे पवित्र बंधन आहे. लग्नाआधी प्रत्येक जण आपल्या जोडीदाराला पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. हेच कारण आहे की बहुतेक लोक एंगेजमेंटनंतर लग्न करण्यापूर्वी काही दिवसाचे गॅप ठेवतात. जेणेकरून एकमेकांना समजून घेण्यासाठी अधिक वेळ मिळेल. मात्र हा काळ खूप नाजूक असतो. अशा परिस्थितीत काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं. काही वेळा छोट्या छोट्या गोष्टींमुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. चला काही गोष्टींबद्दल जाणून घ्या ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत.

यामुळे नात्यात नाराजी येऊ शकते

बहुतेक नात्यांमध्ये लहानसहान गोष्टींवरून भांडणे होतात. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एखादी गोष्ट आवडत नसेल तर तुमचा निर्णय त्याच्यावर लादण्याऐवजी त्याला समजावून सांगा. हे करताना कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही पण या छोट्या गोष्टी कधीतरी तुम्हाला त्रास देऊ शकतात.

तुमच्याबद्दल शंका असू शकते

जे लोक इतरांना जज करतात त्यांना सहसा चुकीचे मानले जाते. जर तुम्ही तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याबद्दल वाईट बोलत असाल तर तसे करू नका. कारण यामुळे तुमचा पार्टनर तुमच्याबद्दल चुकीचा विचार करू शकतो. तुम्ही तुमच्या आवडी-निवडीबद्दल बोलू शकता.

 

चुकूनही हे करू नका

दोन लोकांची मते भिन्न असू शकतात. हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे मत आवडत नसेल तर त्यावर वाद घालण्याऐवजी शांतपणे बोला आणि तुमचा मुद्दा समजावून सांगा. वादविवाद दरम्यान बऱ्याचदा लोकांचा आवाज वाढतो, ज्यामुळे नवीन नाते बिघडू शकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner