Never Eat These Foods With Mangoes: आंबाप्रेमी उन्हाळ्याची आतुरतेने वाट पाहतात. कारण हाच ऋतू आहे जेव्हा लोक हे रसाळ फळ खाऊन आपली गोड खाण्याची हौस भागवतात. आंब्यापासून बनवलेले मँगो शेक, साल्सा आणि डेझर्ट यांसारख्या गोष्टींचा आहारात समावेश करून व्यक्ती स्वत:ला फ्रेश आणि हायड्रेट ठेवू शकते. आपल्या आरोग्याची आणि चवीची काळजी घेणारा फळांचा राजा आंबा, कोणत्याही चुकीच्या पदार्थासोबत खाल्ल्यास याचा आरोग्याला फायदा होण्याऐवजी हानी होऊ शकते. चला जाणून घेऊया आयुर्वेदानुसार आंबा कोणत्या गोष्टींसोबत खाऊ नये.
उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी लोक मँगो शेकचे सेवन करतात आणि दिवसाची सुरुवात टेस्टी पेयाने करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, आयुर्वेदानुसार दूध आणि आंबा यांचे एकत्र सेवन टाळले पाहिजे. या पदार्थाच्या मिश्रणाचा पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या जसे गॅस, ॲसिडिटीचा त्रास व्यक्तीला होऊ शकतो.
मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर आंबा खाल्ल्याने पचनास त्रास होऊ शकतो. मसालेदार पदार्थ पचनसंस्थेला चालना देते, तर आंबा हे एक हेवी फळ आहे जे पचन प्रक्रिया मंद करू शकते. या मिश्रणामुळे पोटात जळजळ, गॅस आणि अपचन होऊ शकते.
उन्हाळ्यात मँगो लस्सी प्यायला अनेकांना आवडते. दही आणि आंब्याचे मिश्रण कधी कधी सलाद किंवा डेझर्ट बनवण्यासाठी वापरले जाते. पण या मिश्रणाचा पचन संस्थेवरही वाईट परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदानुसार दही आणि आंबा एकत्र खाल्ल्याने शरीरात विषारी पदार्थ तयार होतात, ज्यामुळे एलर्जी आणि त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
आंबा खाल्ल्यानंतर लगेच कारले खाणे टाळावे. असे केल्याने मळमळ, उलट्या आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
बहुसंख्य लोक आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची चूक करतात. पण असे केल्याने पोटदुखी, सूज आणि अॅसिडिटीचा त्रास होतो. आंबा खाल्ल्यानंतर किमान अर्ध्या तासाने पाणी प्यावे. आयुर्वेदानुसार फळांसोबत पाणी प्यायल्याने पोटात अॅसिड रिफ्लक्स होऊ शकतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या