Diabetes Diet: मधुमेह असेल तर टाळा हे ड्राय फ्रूट्स, अन्यथा वाढेल रक्तातील साखर!-avoid these dry fruits in diabetes to control blood sugar level ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diabetes Diet: मधुमेह असेल तर टाळा हे ड्राय फ्रूट्स, अन्यथा वाढेल रक्तातील साखर!

Diabetes Diet: मधुमेह असेल तर टाळा हे ड्राय फ्रूट्स, अन्यथा वाढेल रक्तातील साखर!

Aug 04, 2024 10:32 PM IST

Blood Sugar Level: जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर पौष्टिकतेने समृद्ध असूनही हे ड्राय फ्रूट्सचा आहारात समावेश करू नये. हे ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याची भीती असते.

मधुमेहामध्ये टाळावे असे ड्राय फ्रूट्स
मधुमेहामध्ये टाळावे असे ड्राय फ्रूट्स (unsplash)

Avoid These Dry Fruits in Diabetes: हेल्दी डाएटचं विचार केला तर त्यात ड्राय फ्रूट्सचा समावेश नक्की होतो. परंतु मधुमेहाच्या रुग्णांनी निरोगी राहण्यासाठी काही ड्राय फ्रुट्सपासून दूर राहावे. खरं तर, बऱ्याच ड्राय फ्रूट्समध्ये नैसर्गिक साखर काँसंट्रेटेड फॉर्ममध्ये असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. याशिवाय ड्राय फ्रूट्समध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवायची नसेल तर या ड्राय फ्रूट्सचा आहारात अजिबात समावेश करू नका. पाहा हे कोणते ड्राय फ्रूट्स आहेत.

मनुका

मनुकामध्ये भरपूर पोषक घटक असतात. परंतु जेव्हा मधुमेहाचा विचार केला जातो तेव्हा त्यात असलेल्या नैसर्गिक साखरेचे प्रमाण रक्तातील साखर वेगाने वाढवू शकते. त्यामुळे मनुका न खाणे आरोग्यासाठी चांगले असते.

खजूर

तसं पाहिलं तर अनेकदा मधुमेहाच्या रुग्णांना नैसर्गिक गोडवा देण्यासाठी खजूरचा वापर केला जातो. पण तज्ज्ञांच्या मते यात साखरेचे प्रमाण खूप जास्त आहे. ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी अचानक वाढते. ज्या रुग्णांच्या मधुमेहाचे प्रमाण जास्त आहे त्यांनी खजूरपासून दूर राहावे.

अंजीर

अंजीरमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. जेव्हा ते कोरडे होते तेव्हा त्याचे काँसंट्रेटेड फॉर्म रक्तातील साखर वाढवू शकते. त्यामुळे मधुमेहात अंजीर सुद्धा खाणे टाळावे.

क्रॅनबेरी

ड्राय क्रॅनबेरी महिलांसाठी खूप फायदेशीर आहेत आणि लघवीशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जाण्यास मदत करतात. परंतु जर आपण जास्त क्रॅनबेरी खात असाल तर ते आपल्या साखरेची पातळी वाढवू शकते. कारण यामुळे साखरेचे सेवन वाढते.

जर्दाळू आणि प्लम

ही दोन फळेही ड्राय फ्रूट्स म्हणून खूप खाल्ली जातात. ते पौष्टिकतेने समृद्ध असतात. परंतु मधुमेहाच्या रुग्णांनी हे ड्राय फ्रूट्स चुकूनही खाऊ नये.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग