Worst Foods for Kidney: शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीराचे सर्व अवयव निरोगी असणे गरजेचे आहे. हृदय, लिव्हर आणि फुफ्फुसांप्रमाणेच किडनीही निरोगी असणे महत्त्वाचे आहे. शरीराच्या इतर भागांप्रमाणे मूत्रपिंड म्हणजे किडनी देखील खूप महत्वाचे आहेत. हे शरीराचे फिल्टर आहेत, जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. ते शरीरातील रक्त फिल्टर करतात आणि इलेक्ट्रोलाइट्स संतुलित करण्यास मदत करतात. किडनी निरोगी ठेवण्यासाठी हेल्दी पदार्थ खाणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात चुकीच्या गोष्टींचा समावेश केला तर तुम्ही किडनीशी संबंधित आजारांना बळी पडू शकता. जाणून घ्या असे ५ पदार्थ जे खाल्ल्याने किडनीचे नुकसान होउऊ शकते. हे खाणे टाळले पाहिजे.
केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. पण त्यात सोडियमचे प्रमाण कमी असते. किडनीच्या समस्या टाळण्यासाठी आपल्या दैनंदिन आहारात केळीचा समावेश टाळणे चांगले आहे.
जर तुम्ही चिप्ससारखे पॅकेज्ड फूड खात असाल किंवा फ्रेंच फ्राईज खायला आवडत असेल, तर ते तुमच्या किडनीसाठी चांगले नाही. किडनीशी संबंधित समस्या टाळण्यासाठी तळलेले पदार्थ खाणे टाळावे. दुसरीकडे, जर तुम्हाला आधीच किडनीचा आजार असेल तर बटाटे खाणे टाळा. कारण त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे किडनीसाठी चांगले नाही.
कॉफी, चहा, सोडा यांसारख्या पदार्थांमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे तुमच्या किडनीवर दबाव येतो. कॅफिनमुळे रक्त प्रवाह, रक्तदाब आणि मूत्रपिंडावर ताण वाढू शकतो. कॅफीनचे जास्त सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते.
सोडियमचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढतो. त्यामुळे तुमच्या किडनीवर दबाव येतो. कॅन केलेले सूप, प्रोसेस्ड मीट, सॉसेज, फ्रोझन पिझ्झा, केचअप, बीबीक्यू सॉस, सोया सॉस, लोणचे यासारख्या पदार्थांमध्ये मीठ जास्त असते. हे खाणे टाळले पाहिजे.
सोडामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि त्याचे पौष्टिक मूल्य नगण्य असते. दररोज दोन किंवा अधिक कार्बोनेटेड सोडा प्यायल्याने किडनीचा त्रास होऊ शकतो. कार्बोनेटेड आणि एनर्जी ड्रिंक्स दोन्हीमुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. हे टाळणे उत्तम.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)