Foods Eaten Raw Gives Maximum Benefits: हेल्दी आणि कमी-कॅलरी आहारासाठी फळे आणि भाज्या हे सर्वोत्तम पर्याय आहेत. त्यात शिजवलेल्या अन्नापेक्षा जास्त पोषक तत्त्व असतात आणि कॅलरी खूप कमी असतात. कारण ते तेलात शिजवण्याचा त्रास नसतो. अनेक फळे आणि भाज्या अशा असतात की त्या शिजवल्याने त्यातील आवश्यक पोषक घटक नष्ट होतात. म्हणूनच ते कच्चे खाणे फायदेशीर आहे. जर तुम्ही या पदार्थांचा आहारात समावेश करत असाल तर ते कच्चे खाण्याचा प्रयत्न करा. तरच सर्व आवश्यक पोषण सहज उपलब्ध होईल.
कांदा
कांदा ही अशी भाजी आहे जी जवळपास प्रत्येक घरात वापरली जाते. वरण, भाजी, ग्रेव्ही बनवण्यासाठी ते शिजवले जाते. जर तुम्हाला कांद्याचे सर्व पोषक तत्व हवे असतील तर ते कच्च्या सॅलडच्या रूपात खाणे अधिक फायदेशीर आहे. कांद्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात जे लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत करतात. दुसरीकडे, कच्च्या सॅलडमध्ये येणारा वास हा अॅलिसिन नावाच्या विशेष संयुगामुळे येतो, जो हृदयविकार कमी करण्यास, हाडांची घनता वाढविण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतो.
बीटरूट
बीटरूट ही लोहाने समृद्ध असलेली भाजी आहे. जे कच्चे खाल्ल्याने अधिक फायदा होतो. सॅलड किंवा ज्यूस बनवून तुम्हाला बीटरूटचे सर्व पोषक तत्व मिळतात. बीटरूट खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. त्याचबरोबर ही भाजी खूप ऊर्जा देते.
टोमॅटो
टोमॅटोचा वापर प्रत्येक घरात ग्रेव्ही आणि सॅलड बनवण्यासाठी केला जातो. पण टोमॅटोच्या संपूर्ण पौष्टिकतेचा फायदा घ्यायचा असेल, तर ते सॅलडच्या स्वरूपात खाणे अधिक फायदेशीर आहे. शिजवल्याने टोमॅटोचे आवश्यक पोषक तत्व नष्ट होतात.
लसूण
कच्चा लसूण खाणे थोडे कठीण आहे पण कच्चा खाणे जास्त फायदेशीर आहे. रोज सकाळी कच्चा लसूण खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. यासोबतच फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोकाही कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासोबतच रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
ब्रोकोली
ब्रोकोली ही हेल्दी भाज्यांपैकी एक आहे, ज्याचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. ब्रोकोली कच्च्या सॅलडच्या स्वरूपात खाणे नेहमीच फायदेशीर असते. जर तुम्हाला ते शिजवायचे असेल तर ते मीठाच्या पाण्यात हलके ब्लँच करा. अशा प्रकारे खाल्ल्याने ब्रोकोलीतील सर्व आवश्यक पौष्टिक जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने आणि अँटी-ऑक्सिडंट्स मिळतात. ब्रोकोली खाल्ल्याने कर्करोगाच्या पेशी नष्ट होण्यास मदत होते.
शिमला मिर्ची
रिपोर्ट्सनुसार, शिमला मिरची कच्ची खाल्ल्याने दैनंदिन आहारासाठी आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन सी देखील मिळते. व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियमने समृद्ध शिमला मिरची शिजवल्याने आवश्यक पोषण नष्ट होऊ लागते.
नट्स
ड्रायफ्रुट्स किंवा नट्स भाजून खाल्ल्याने चव वाढते. जर तुम्हाला ड्रायफ्रूट्सचे सर्व पोषक घटक हवे असतील तर ते कच्चे खाणे फायदेशीर आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)