When Should Avoid Checking Weight: जेव्हा वजन कमी करायचे असते किंवा वाढवायचे असते तेव्हा खूप मेहनत करावी लागते. अनेक लोकांना हे खूप कष्टाचे काम वाटते. यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करण्यासोबतच मेहनतही घ्यावी लागते. मात्र खूप मेहनत करूनही वजन तपासल्यानंतर काहीही बदल न झाल्यास निराश वाटू लागते. चुकीच्या वेळी वजन तपासल्यामुळे सुद्धा असे होऊ शकते. तज्ज्ञ डॉ. श्री विद्या प्रशांत यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये वजन कधी तपासू नये हे सांगितले आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
मासिक पाळी येण्याच्या ३-४ दिवस आधी शरीरावर सूज येते आणि हार्मोनल चढ-उतार आणि पाणी टिकून राहिल्यामुळे वजन वाढू लागते. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनमधील चढ-उतारांमुळे जास्त पाणी साचते. यामुळे काही लोकांमध्ये स्तन, पोट आणि हातापायांमध्ये सूज येते. याशिवाय मासिक पाळीत मॅग्नेशियमची पातळी कमी होते आणि साखर खाण्याची इच्छा होते. ज्यामुळे शरीराचे वजन वाढते.
कोणत्याही शारीरिक हालचाली किंवा व्यायामानंतर व्यक्तीने लगेच वजन मोजू नये. खरं तर शारीरिक हालचालींनंतर शरीरातील द्रवपदार्थाच्या कमतरतेमुळे वजन चढ-उतार होऊ शकते.
जास्त खाल्ल्यानंतर आणि जास्त प्रमाणात पाणी पिल्यानंतर लगेच वजन तपासणे योग्य नाही. कारण नमकीन अन्न खाल्ल्यानंतर शरीरात पाणी टिकून राहते. ज्यामुळे शरीराचे वजन वाढते.
लांब प्रवासामुळे द्रव आणि इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊ शकते. यामुळे शरीरात थोडे वजन वाढू शकते.
उन्हाळ्यात जेव्हा बाह्य वातावरणाचे तापमान जास्त असते तेव्हा आपली किडनी जास्त प्रमाणात लिक्विड उत्सर्जित करतात. त्यामुळे या काळात वजन तपासणे टाळावे.
बद्धकोष्ठता आणि पोट फुगण्याची समस्या असताना वजन न तपासणे चांगले असते. वास्तविक बद्धकोष्ठतेदरम्यान तुम्ही तुमचे वजन तपासले तर तुमच्या शरीराचे वजन वाढलेले आढळून येईल. तथापि पोट बरे झाल्यानंतर वजन कमी होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या