Safety Tips For Asthma Patients During Holi: दम्याच्या रुग्णांना नेहमीच काळजी घ्यावी लागते. अन्यथा त्यांचा दम्याचा त्रास कधीही सुरू होऊ शकतो. बदलत्या हवामानासोबतच होळीच्या सणातही त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही रंग खेळण्याचा विचार करत असाल तर या छोट्या टिप्स नक्की फॉलो करा. जेणेकरून कोणताही मोठा त्रास होणार नाही आणि उत्सवाची मजाही खराब होणार नाही. दम्याच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी ते जाणून घ्या.
होळी म्हटली की प्रत्येकाला रंग खेळायला आवडते. पण जर तुम्हाला रंगाच्या नुकसानपासून स्वतःला वाचवायचे असेल तर मास्क अवश्य घाला. नाक व तोंड झाकलेले नसल्यास रंगाचे कण तोंडात व नाकात जाण्याचा धोका असतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
दम्याच्या रुग्णांना जास्त शारीरिक श्रम करण्यास मनाई आहे. रंग खेळताना तुम्ही खूप धावत असाल तर तुम्हाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होण्याची भीती असू शकते आणि दम्याचा झटका येण्याचाही धोका असतो.
सिंथेटिक आणि रासायनिक रंगांपासून शक्यतो दूर राहा. त्यामध्ये असलेल्या हानिकारक रसायनांमुळे नाक आणि तोंडातून जाऊन एलर्जी होऊ शकते. याशिवाय दम्याच्या रुग्णांच्या समस्याही वाढण्याची भीती आहे.
होळीच्या उत्साहात बिअर आणि वाईनसारख्या अल्कोहोलयुक्त पेयांपासून दूर रहा. आनंद घ्यायचा असेल तर फळांचा रस किंवा थंडाई प्या.
यासोबतच खूप गर्दीच्या ठिकाणी जाणे देखील टाळा. धूर, धुम्रपान आणि जास्त वेळ पाण्यात राहिल्याने सुद्धा श्वसनाचा त्रास होऊ शकतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या