Fasting Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासासाठी बनवा कुरकुरीत साबुदाणा वडा, सोपी आहे रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fasting Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासासाठी बनवा कुरकुरीत साबुदाणा वडा, सोपी आहे रेसिपी

Fasting Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासासाठी बनवा कुरकुरीत साबुदाणा वडा, सोपी आहे रेसिपी

Published Jul 16, 2024 11:32 AM IST

Ashadhi Ekadashi Special Recipe: आषाढी एकादशीला उपवास करणार असाल तर ही रेसिपी फॉलो करून कुरकुरीत साबुदाणा वडा बनवा.

साबुदाणा वडा रेसिपी
साबुदाणा वडा रेसिपी (freepik)

Crispy Sabudana Vada Recipe: उपवास म्हटलं की साबुदाणा आणि त्याचे विविध पदार्थ बनवले जातात. १७ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. या दिवशी बहुतांश लोक उपवास करतात. उपवासासाठी सहसा साबुदाणा खिचडी बनवली जाते. पण तुम्हाला आषाढी एकादशीच्या उपवासासाठी साबुदाणा खिचडी खायची नसेल तर तुम्ही साबुदाणा वडा बनवू शकता. ही रेसिपी फॉलो करून तुम्ही घरच्या घरी सहज कुरकुरीत साबुदाणा वडा बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

साबुदाणा वडा बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- साबुदाणा - १ कप

- उकडलेले बटाटे - ४

- हिरवी मिरची - २ (बारीक चिरलेली)

- कोथिंबीर - २-३ चमचे (बारीक चिरून)

- शेंगदाणे - १/२ कप (बारीक केलेले)

- काळी मिरी - १/४ छोटा चमचा ( बारीक केलेले)

- तूप - ४ चमचे

- सैंधव मीठ - चवीनुसार

कुरकुरीत साबुदाणा वडा बनवण्याची पद्धत

कुरकुरीत साबुदाणा वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम साबुदाणा धुऊन स्वच्छ करून घ्या. आता हा साबुदाणा साधारण दीड वाटी स्वच्छ पाण्यात भिजवून २ तास फुलण्यासाठी ठेवा. २ तासांनंतर साबुदाणामधील अतिरिक्त पाणी काढून टाका आणि फेकून द्या. यानंतर उकळलेले बटाटे सोलून घ्या. ते मॅश करून साबुदाण्यामध्ये मिक्स करा. हे एकत्र चांगले मॅश करा. आता त्यात सैंधव मीठ, काळी मिरी पावडर, हिरवी मिरची आणि बारीक केलेले शेंगदाणे घाला. हे सर्व चांगले मिक्स करा. आता तुमचे साबुदाणा वडा बनवण्याचे मिश्रण तयार आहे. तळहाताला थोडे तेल लावून वडाचे मिश्रण घेऊन गोलाकार करा आणि नंतर तळहाताने थोडे चापट करा. अशा प्रकारे सर्व वडे तयार करून घ्या. 

आता एका सपाट तळाच्या कढईन किंवा पॅनमध्ये तूप टाकून गॅसवर ठेवा. तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता. हे गरम झाल्यावर त्यात तयार केलेले वडे टाका. कढई किंवा पॅनच्या आकारानुसार ४-५ वडे एका वेळी टाकू शकता. आता हे वडे दोन्ही बाजूने सोनेरी तपकिरी होईपर्यंत नीट तळून घ्या. हे वडे क्रिस्पी होण्यासाठी गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. तुमचा साबुदाणा वडा तयार आहे. दही किंवा चटणीसोबत गरमा गरम सर्व्ह करा.

Whats_app_banner