Iv Hydration Therapy: अर्जुन कपूरने घेतली IV हायड्रेशन थेरेपी! का घेतली जाते ही ट्रीटमेंट? वाचा फायदे-arjun kapoor benefits of iv hydration therapy taken by bollywood actor ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Iv Hydration Therapy: अर्जुन कपूरने घेतली IV हायड्रेशन थेरेपी! का घेतली जाते ही ट्रीटमेंट? वाचा फायदे

Iv Hydration Therapy: अर्जुन कपूरने घेतली IV हायड्रेशन थेरेपी! का घेतली जाते ही ट्रीटमेंट? वाचा फायदे

Aug 06, 2024 09:28 AM IST

IV Hydration Therapy: अर्जुन कपूरचा एक थ्रोबॅक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत त्याच्या हातात आयव्ही ड्रिप आहे.

Hydration Therapy Benefits
Hydration Therapy Benefits

IV Hydration Therapy: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपच्या बातमीनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी चर्चेत राहण्याचे कारण त्यांचे रिलेशनशिप स्टेटस नसून काही वेगळंच आहे. अर्जुन कपूरचा एक थ्रोबॅक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत त्याच्या हातात आयव्ही ड्रिप आहे. ज्यानंतर त्याच्या चाहत्यांना त्याच्या तब्येतीची चिंता सतावत आहे. अर्जुनचा हा थ्रोबॅक फोटो पाहून त्याच्या प्रत्येक चाहत्याला आयव्ही थेरपीबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. चला जाणून घेऊया काय आहे ही थेरपी आणि लोकांना त्याची गरज नेमकी का आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, इंट्राव्हेनस मायक्रोन्यूट्रिएंट थेरपी ही एक व्हिटॅमिन थेरपी आहे. ज्याला वैद्यकीय भाषेत हायड्रेशन थेरपी देखील म्हणतात. या थेरपीमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स सलाईनच्या साहाय्याने थेट रक्तात सोडले जातात. जेणेकरून ते शरीरातील हाय डोस शोषून घेऊ शकेल. या थेरपीमध्ये सप्लीमेंट्सपेक्षा व्हिटॅमिन्स-मिनरल्स शरीरात वेगाने शोषली जातात. या थेरपीचा परिणाम शरीरावर लगेच होऊ लागतो. पचन आणि श्वसनाच्या समस्यांमध्ये ही थेरपी अतिशय प्रभावी मानली जाते.

IV हायड्रेशन थेरपी का दिली जाते?

IV हायड्रेशन थेरपीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. ही थेरपी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास, हँगओव्हर कमी करण्यास, वजन कमी करण्यास आणि वृद्धत्वाचे परिणाम कमी करण्यास मदत करते. इतकेच नव्हे तर त्वचा नितळ ठेवण्यासाठी आणि ग्लो आणण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आयव्ही हायड्रेशन थेरपीचा वापर करतात. सामान्यतः, डॉक्टर शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता दूर करण्यासाठी ही थेरपी देतात. जर एखाद्या व्यक्तीला औषधोपचार घेण्यास त्रास होत असेल तर त्याला IV थेरपी दिली जाऊ शकते.

हायड्रेशन थेरपीचे फायदे -

-आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पचन आणि श्वसनाच्या समस्यांनी त्रस्त लोकांसाठी हायड्रेशन थेरपी खूप फायदेशीर आहे.

-हायड्रेशन थेरपी घेतल्याने केवळ लठ्ठपणाच नाही तर शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता दूर होऊ शकते.

-ही थेरपी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास, हँगओव्हर कमी करण्यास, वजन कमी करण्यास आणि वृद्धत्वाचा प्रभाव कमी करण्यास मदत करते.

हायड्रेशन थेरपीची किंमत-

रिपोर्ट्सनुसार, या थेरपीची किंमत सुमारे २५ हजार ते ३० हजार रुपये असू शकते. यातून व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि खनिजांचे उच्च डोस प्रदान करण्यात येतात.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग