Easy Way To Wear Saree: बऱ्याचदा नवीन साडी नेसायला लागलेल्या महिलांना साडी नेसताना खूप अडचणी येतात. अनेक प्रयत्न करूनही साडीला तो लुक मिळत नाही जो सहसा सेलिब्रिटींच्या साडीत दिसतो. त्यांच्या साड्या फुगतात आणि त्या चांगल्या दिसण्याऐवजी जाड आणि फुगीर दिसू लागतात. त्यामुळेच आज आम्ही अशा ४ चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्या दुरुस्त करून तुम्ही तुमच्या साडीत प्रत्येक वेळी परफेक्ट दिसू शकता. योग्य पद्धतीने साडी नेसल्याने तुम्हाला सुंदर आणि आकर्षक लूक तर मिळेलच, पण तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्त्वही उठून दिसेल.
स्त्रिया साडी नेसताना पहिली चूक करतात, ती म्हणजे जेव्हा त्या कंबरेवर मागून पुढच्या बाजूस फॅब्रिक आणतात. आणि साडीची बॉर्डर सेट करतात. तेव्हा त्या पिन खूप खाली लावतात. ज्यामुळे बॉर्डर दुमडली जाते. आणि मध्ये खोवलेली साडी विचित्र दिसू लागते.
पुढचा भाग पिन केल्यानंतर, कमीतकमी १२ ते १४ इंच साडीचे कापड सोडणे आवश्यक आहे. जे बहुतेक मुली, स्त्रिया करत नाहीत. जर तुम्ही कमी फॅब्रिक सोडले तर ते समोरच्या बाजूस खोवण्यात अडचण येईल. त्यामुळे समोरून साडीचे मोजमाप केल्यावर हातापर्यंत कापड सोडा आणि नंतर साडीचे प्लीटिंग करा. यामुळे निऱ्या आणि साइड फिटिंग खूप चांगले दिसेल.
जर पुढच्या बाजूस निऱ्या केल्यानंतर काही कापड उरले असेल तर ते थेट साडीत खोवु नका. असे केल्याने साडीचा आकार फुगीर होईल. शेवटच्या निरीच्या आत जुळवून घेऊन आणि मगच साडीला समोरून खोवून घेतले तर बरे होईल.
साडी खोवताना, साडी अनेकदा समोरून उंच होते. खोवण्याआधी निऱ्या पायाने दाबून नंतर खोवला तर बरे होईल. या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही साडी नेसल्यास प्रत्येक वेळी तुम्ही साडीत परफेक्ट दिसाल.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )