Right Way of Applying Eggs on Hair: केस जाड, लांब आणि चमकदार बनवण्यासाठी अनेक वेळा लोक अंड्यांचा वापर करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, केसांवर अंड्यांचा जास्त वापर केल्याने फायद्याऐवजी नुकसान होऊ लागते. जर तुम्ही तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये अंडी महत्त्वाची मानत असाल, तर त्याच्या जास्त वापरामुळे केसांना कोणते मोठे नुकसान होते जाणून घ्या. अंड्याचा अती वापर तसेच चुकीच्या पद्धतीने केलेल्या वापरामुळे केसांचे नुकसान होते. त्यामुळे अंडी लावण्याची योग्य पद्धत तसेच अंडी लावताना काय काळजी घ्यावी, केसांचे होणारे नुकसान येथे जाणून घ्या.
अंड्याचा हेअर मास्क लावल्याने केस मजबूत आणि मऊ होतात. पण केसांना अंड्यातील पिवळ बलक लावल्यास कोंड्याची समस्या होऊ लागते. कोंडामुळे होणारी खाज आणि जळजळ केसांच्या कूपांना नुकसान करते. त्यामुळे केस निर्जीव आणि कमकुवत होतात आणि तुटायला लागतात.
जेव्हा टाळू खूप तेलकट होते तेव्हा कोंड्याची समस्या वाढू लागते. अंड्यातील पिवळा भाग केस आणि टाळूमध्ये कोंडा वाढवतो. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही अंड्याचा पांढरा भाग केसांना लावू शकता.
ज्या लोकांचे केस ड्राय असतात त्यांच्यासाठी अंड्याचा हेअर मास्क केसांना रेशमी आणि मुलायम बनवण्याचे काम करतो. पण ज्यांचे केस आधीच ऑइली आहेत त्यांनी केसांना अंडी लावणे टाळावे. अशा केसांवर अंडी लावल्याने केस आणि टाळू अधिक तेलकट होऊ शकतात. त्यामुळे डोक्यातील कोंडा आणि इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो.
अंड्यातील पिवळ बलक केसांना लावल्याने दुर्गंधी येते. वास्तविक अंड्यातील पिवळ बलकमध्ये असलेले घटक केसांच्या नैसर्गिक तेलासोबत मिक्स होतात आणि वास निर्माण करतात. जे कधी कधी सहन करणे कठीण होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या