मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Beauty Tips : चेहऱ्यावर खोबरेल तेल लावणं कितपत फायदेशीर; काय आहेत धोके?

Beauty Tips : चेहऱ्यावर खोबरेल तेल लावणं कितपत फायदेशीर; काय आहेत धोके?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 20, 2022 11:40 AM IST

Beauty Tips : जर तुम्ही चेहऱ्याचं सौंदर्य वाढावं म्हणून त्यावर खोबरेल तेल लावत असाल तर तुम्हाला वेळीच सावध होणं गरजेचं आहे.

Side Effects Of Applying Coconut Oil On Face
Side Effects Of Applying Coconut Oil On Face (HT)

Side Effects Of Applying Coconut Oil On Face : अनेक महिला आणि पुरुष हे आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी त्यावर खोबरेल तेल लावत असतात. यामुळं त्वचा आणि चेहऱ्यासाठी फायदा असल्याचं अनेक लोकांना वाटत असलं तरी ते आरोग्यासाठी हितावह नाही. यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो. नारळाच्या तेलात प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम असल्यानं ते आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर असतात. परंतु ते प्रत्येकासाठीच फायदेशीर असेल असं नाही.

काय आहे धोका?

ज्या लोकांचा चेहरा नेहमी तेलकट असतो त्या लोकांनी कधीही खोबरेल तेलाचा वापर करू नये. कारण ते तुमच्या चेहऱ्याच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरण्याची शक्यता असते. ज्या लोकांना मुरुमांचा त्रास आहे अशा लोकांचा चेहरा जास्त तेलकट होण्याचा धोका असतो. त्यामुळं अशा लोकांनी चेहऱ्यावर तेल लावणं टाळायला हवं. याशिवाय चेहऱ्यावर तेलाचं प्रमाण वाढल्यास त्यामुळं दूषित हवेचे कण चेहऱ्यावरील छिद्रांमध्ये जमा व्हायला लागतात, ज्यामुळे मुरुम येण्याचा धोका वाढतो.

त्वचा तेलकट होते...

उन्हाळ्यात अनेक लोकांची त्वचा ही तेलकट होत असते. त्यामुळं अशा वेळेस चेहऱ्यावर तेल लावल्यास त्यामुळं चेहरा आणखी खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळं उन्हाळ्यात काळात चेहऱ्यावर तेल लावणं टाळायला हवं.

केसांची समस्या...

सातत्यानं चेहऱ्यावर तेल लावल्यास त्यामुळं चेहऱ्यावर केस येण्याचा धोका वाढतो. त्यामुळं तुम्हाला चेहऱ्यावर तेल लावणं आवडत असेल तर ही सवय तात्काळ थांबवायला हवी. त्यामुळं तुमचा चेहरा विद्रुप होण्याचा धोका असतो.

ऍलर्जीचा त्रास...

खोबरेल तेल हे चेहऱ्यावर लावणं प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यासाठी योग्य नसते. खोबरेल तेल वापरल्याने काही व्यक्तींच्या त्वचेवर ऍलर्जी होण्याची शक्यता असते, ज्यांची त्वचा संवेदनशील आहे अशा लोकांनी चेहऱ्यावर खोबरेल तेल लावणं टाळायला हवं.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या