मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dark Circle: डोळ्यांखालील डार्क सर्कल दूर करण्यासाठी लावा अंडर आय पॅक, दिसेल फरक

Dark Circle: डोळ्यांखालील डार्क सर्कल दूर करण्यासाठी लावा अंडर आय पॅक, दिसेल फरक

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 10, 2024 03:49 PM IST

Home Remedies: सतत लॅपटॉप, मोबाईलवर काम केल्यामुळे आणि डोळ्यांच्या थकव्यामुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल दिसू लागतात. हे दूर करण्यासाठी तुम्ही घरी हा अंडर आय पॅक बनवून रोज लावू शकता.

डार्क सर्कल दूर करण्यासाठी अंडर आय पॅक
डार्क सर्कल दूर करण्यासाठी अंडर आय पॅक (unsplash)

Under Eye Pack for Dark Circle: डोळ्यांखालील डार्क सर्कल म्हणजेच काळी वर्तुळे खूप वाईट दिसतात. कधी कधी या डार्क सर्कलचे कारण पोषक तत्वांची कमतरता असते. तर अनेक थकव्यामुळे सुद्धा काळी वर्तुळे दिसू लागतात. यासोबतच काही वेळा योग्य झोप न मिळाल्याने डोळ्यांच्याा खाली डार्क सर्कल वाढतात. जर तुम्हाला थकवा आणि सततच्या कामामुळे झोप येत नसेल, सतत लॅपटॉप, मोबाईलवर काम केल्यामुळे तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल असतील तर हा पॅक अंडर आय पॅक लावा. घरी बनवलेला हा सोपा अंडर आय पॅक लावल्याने तुम्हाला काही दिवसात फरक दिसून येईल.

डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी करा या गोष्टी

जर तुमची झोप पूर्ण होत नसेल आणि थकव्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येत असतील तर यासाठी गुलाब जल वापरा. एका वाटीत गुलाब जल घ्या. मग त्यात कॉटन पॅड भिजवून मग डोळ्यांवर ठेवून झोपा. साधारण ५ मिनिटे दोन्ही डोळ्यांवर असेच ठेवा. हे रोज लावल्याने डोळ्यांचा थकवा काही दिवसातच निघून जाईल आणि फ्रेशनेस दिसेल.

डार्क सर्कलसाठी बनवा अंडर आय पॅक

डोळ्यांखालील डार्क सर्कल कमी करण्यासाठी त्यावर प्रभावी अंडर आय पॅक लावा. हा पॅक बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल

- दोन चिमूटभर हळद

- एक चमचा गुलाब जल

- एक चमचा बटाट्याचा रस

या सर्व गोष्टी एका काचेच्या बाउटमध्ये घेऊन मिक्स करा. आता हा तयार झालेला पॅक डोळ्यांखाली लावा आणि सुमारे २० मिनिटे राहू द्या. २० मिनिटांनी डोळे थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन ते तीन दिवस हा पॅक लावल्यास काही दिवसातच फरक दिसून येईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel