Cracked Skin Home Remedies: हिवाळा आला की त्वचा कोरडी पडते. त्वचेशी संबंधित समस्याही सुरु होतात. कोरडी हवा आणि गरम पाण्यामुळे हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊ लागते. अंघोळ केल्यावर साबणामुळे आणि गरम पाण्यामुळे त्वचा कोरडी होते. अशा स्थितीत त्वचा पांढरी दिसू लागतो. नखांना हलके स्पर्श केल्यावरच त्वचेवर लांब पांढरे पट्टे दिसू लागतात. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल आणि हिवाळ्यात ती पांढरी दिसू लागली असेल तर आंघोळीनंतर चेहऱ्यावर तेल लावणे गरजेचे आहे. जेणेकरून त्वचेत ओलावा दिसून येईल आणि चमक कायम राहील. हे तेल घरीच उपलब्ध होतात यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही.
चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल सगळ्यात उत्तम ठरेल. ऑलिव्ह ऑईल त्वचेला ओलावा देते आणि त्वचेची जळजळ कमी करते.
फॅटी ऍसिडस् युक्त समृद्ध खोबरेल तेल त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. हे तेल त्वचेवर चमकही आणते. यामुळे त्वचेवर तडे जात नाहीत. जास्त कोरड्या त्वचेसाठी नारळापेक्षा चांगले काहीही नाही.
कच्चे दूध तर रामबाण उपाय आहे. हे दूध चोळल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. चेहऱ्यावर कच्चे दूध १० ते १५ मिनिटे लावून ठेवा. या नंतर चेहरा नंतर पाण्याने धुवा. यानंतर तुम्ही कोणतेही क्रीम लावल्यास चेहऱ्यावर चमक दिसेल आणि त्वचा कोरडी दिसणार नाही.
व्हिटॅमिन ई समृद्ध बदाम तेल त्वचेला आतून उजळ करते. बदामाच्या तेलाचे काही थेंब चेहर्यावर लावल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)