Glowing Skin: चेहऱ्यावर हवा पार्लरसारखा ग्लो? दररोज या तेलाने करा मसाज-apply this homemade massage oil daily on face to get parlour like glowing skin ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Glowing Skin: चेहऱ्यावर हवा पार्लरसारखा ग्लो? दररोज या तेलाने करा मसाज

Glowing Skin: चेहऱ्यावर हवा पार्लरसारखा ग्लो? दररोज या तेलाने करा मसाज

Mar 04, 2024 11:34 AM IST

Massage for Glowing Skin: चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी लोक अनेकदा पार्लरमध्ये जातात. पण महिन्यातून एकदा पार्लरमध्ये मसाज करून घेण्याऐवजी रोज घरी या खास तेलाने मसाज करा.

ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी मसाज ऑइल
ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी मसाज ऑइल (unsplash)

Homemade Massage Oil To Get Glowing Skin: चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी लोक अनेकदा पार्लरमध्ये जातात. पण जास्त पैसे खर्च न करता घरी बसून पार्लरसारखी चमक हवी असेल तर चेहऱ्याला मसाज करा. दररोज चेहऱ्याला मसाज केल्याने त्वचेतील रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे त्वचेवर ग्लो दिसू लागते. चेहऱ्याला मसाज करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे तेल असणे देखील महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया चेहऱ्यावर पार्लरसारखा ग्लो देण्यासाठी कोणते तेल चांगले आहे.

घरी बनवा मसाज ऑइल (How to make Massage Oil at Home)

चेहऱ्यावर पार्लरसारखी चमक आणि टाईट स्किन मिळवण्यासाठी पार्लरमधील एक दिवसाच्या मसाज ऐवजी दररोज मसाज करा. एखाद्या लहान मुलाची रोज मालिश केली जाते तसेच तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा रोज मसाज करा. दररोज त्याच आपल्या चेहऱ्याची मालिश केल्याने त्वचेला घट्टपणा येईल आणि लूज स्किनची समस्याही लवकरच दूर होईल. घरच्या घरी अशा प्रकारे मसाज तेल बनवा.

- एक चमचा मध

- एक चमचा ग्लिसरीन

- एक चमचा बदाम तेल

या तीन गोष्टी एकत्र करून तीन ते चार दिवस ठेवा. जास्त दिवसांसाठी हे तेल बनवण्यास यातील मध खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे थोडे दिवस चालेल एवढेच तेस बनवा. रात्री झोपण्यापूर्वी या तेलाच्या मदतीने चेहरा आणि मानेला मसाज करा. मसाज करताना लक्षात ठेवा की तुमच्या बोटांची हालचाल वरच्या दिशेने आणि गालाच्या बाहेरील कडा म्हणजेच कानाकडे असावी. यामुळे चेहरा सैल होण्याऐवजी घट्ट होण्यास मदत होईल.

कसा करावा मसाज

चेहऱ्याला मसाज करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी या तेलाची मालिश करा आणि रात्रभर राहू द्या. सकाळी चेहरा पाण्याने धुवा. दररोज बदामाच्या तेलात या दोन गोष्टी मिसळून मसाज करा. त्यामुळे काही दिवसांतच फरक दिसून येईल आणि तुम्ही पार्लरमध्ये जाण्याचा विचारही करणार नाही. याने चेहऱ्यावर पार्लरसारखा ग्लो येईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग