Acne in Pregnancy: गरोदरपणात एक्नेमुळे चेहरा खराब दिसतोय? या पद्धतीने घ्या काळजी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Acne in Pregnancy: गरोदरपणात एक्नेमुळे चेहरा खराब दिसतोय? या पद्धतीने घ्या काळजी

Acne in Pregnancy: गरोदरपणात एक्नेमुळे चेहरा खराब दिसतोय? या पद्धतीने घ्या काळजी

Published Nov 23, 2023 01:09 PM IST

Pimple and Acne in Pregnancy: गरोदरपणात हार्मोनल चढउतारांमुळे अनेक महिलांना पिंपल्स आणि एक्नेच्या समस्या सुरू होतात. अशा परिस्थितीत बाजारातील केमिकलयुक्त क्रीम वापरण्याऐवजी हा फेस पॅक लावा.

गरोदरपणात पिंपल्स, एक्ने कमी करण्यासाठी फेस पॅक
गरोदरपणात पिंपल्स, एक्ने कमी करण्यासाठी फेस पॅक (unsplash)

Homemade Face Pack for Pimple and Acne in Pregnancy: प्रेग्नेंसीचे पहिले ३ महिने खूप वेदनादायक असतात. यावेळी हार्मोनल चढ-उतारांमुळे, मूडवर नियंत्रण राहत नाही. याशिवाय शारीरिक बदलांचाही परिणाम होतो. त्याचबरोबर अनेक महिलांच्या त्वचेवर हार्मोन्सचा प्रभाव पडतो. एन्ड्रोजन हार्मोन्समुळे त्वचेवर सेबमचे उत्पादन वाढते आणि छिद्र बंद होतात. त्यामुळे पिंपल्स आणि एक्ने दिसू लागतात. विशेषत: ज्या महिलांची त्वचा तेलकट आणि संवेदनशील असते त्यांना मुरुमांची समस्या जास्त असते. हा घरगुती फेस मास्क गर्भधारणे दरम्यान मुरुमांच्या समस्येला तोंड देण्यासाठी खूप मदत करतो आणि त्वचेच्या पोर्सना हंद होण्यापासून प्रतिबंधित करतो.

गरोदरपणात मुरुमांसाठी बनवा हा फेसपॅक

संवेदनशील त्वचेच्या महिलांना गरोदरपणात चेहऱ्यावर मुरुमांच्या समस्येला सामोरे जावे लागत असेल तर ओट्सच्या फेस पॅक वापरु शकता.

ओट्स फेस पॅक बनवण्यासाठी साहित्य:

- १ काकडी

- १ चमचा ओटमील

- एक चमचा मध

- अर्धा चमचा गुलाब जल

काकडी, ओट्स आणि मध यांचा फेस पॅक कसा बनवायचा

- सर्वप्रथम काकडीचा कडू भाग कापून काढून टाका.

- नंतर या काकडीचा रस काढा. काकडी किसून त्याचा रस काढता येतो. किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा काकडीचा रस बनवू शकता.

- या ताज्या काकडीच्या रसात एक चमचा ओटमील टाका आणि थोडा वेळ राहू द्या.

- साधारण ५ मिनिटांनंतर ओट्स काकडीचा रस शोषून घेतील.

- नंतर त्यात मध टाका.

- तुम्हाला हवे असल्यास गुलाब जलाचे काही थेंबही टाकू शकता.

- तुमचा ओटमील फेस पॅक तयार आहे.

- ते लावण्यासाठी आधी चेहरा स्वच्छ करा.

- नंतर ओट्सचा तयार केलेला फेस पॅक लावा आणि कोरडा होऊ द्या.

- ते थोडे सुकल्यावर चेहऱ्याला स्क्रब करून काढून टाका.

 

- हा फेस पॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहऱ्यावर लावा.

- हे गर्भधारणेदरम्यान मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner