Face Mask for Open Pores: त्वचा ऑइली असो वा ड्राय ओपन पोर्सची समस्या बहुतेकांना त्रास देते. यात त्वचेचे छिद्र खूप मोठे होतात आणि चेहऱ्यावर मोठ्या खड्ड्यांसारखे दिसतात. हे ओपन पोर्स दुरून स्पष्टपणे दिसतात आणि ते खूप खराब दिसतात. जर तुम्हालाही ओपन पोर्सची समस्या असेल तर हा घरगुती मास्क चेहऱ्यावर लावून पहा. काही महिन्यांच्या वापरानंतर त्वचा क्लीन आणि क्लिअर दिसू लागेल. जाणून घ्या हा फेस मास्क कसा बनवायचा आणि वापरायचा.
त्वचेवर छिद्र मोठे दिसण्याची अनेक कारणे आहेत. ऑइली स्किन हे एक कारण आहे. ऑइली स्किनचे कारण म्हणजे सेबमचे जास्त उत्पादन होणे. त्यामुळे छिद्रांचा आकार वाढतो आणि ते खराब दिसतात. ज्या त्वचेवर मुरुम आणि पुरळ मोठ्या प्रमाणात दिसतात त्यांच्यामध्ये मोठ्या छिद्रांची समस्या सामान्य आहे. तसेच ड्राय स्किनवर देखील कधी कधी पोर्स ओपन आणि मोठे दिसतात. त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी हा एक उपाय तुमची मदत करू शकतो. जाणून घ्या.
हा फेस मास्क बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -
- १ छोटा टोमॅटो
- १ चमचा कच्चे दूध
- १ चमचा मध
एका बाऊलमध्ये कच्चे दूध आणि मध घेऊन चांगले मिक्स करा. आता या मिश्रणात अर्धा चिरलेला टोमॅटो बुडवून याने त्वचेवर सुमारे अर्धा तास मसाज करा. हलक्या हातांनी मसाज केल्यानंतर साधारण ५ ते १० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा.
हा फेस मास्क आठवड्यातून दोन ते तीन वेळा ३ महिने सतत वापरा. तरच फरक दिसून येईल आणि ओपन पोर्सची समस्या कमी होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या