मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dull Skin Care: घाम आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज झाली का? उपयुक्त ठरेल काकडीचा फेस पॅक

Dull Skin Care: घाम आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज झाली का? उपयुक्त ठरेल काकडीचा फेस पॅक

May 19, 2024 01:23 PM IST

Summer Skin Care Tips: जर तुम्हाला उष्णतेमुळे तुमच्या त्वचेवर जळजळ आणि निस्तेजपणा जाणवत असेल तर या गोष्टी काकडीत मिसळून फेस पॅक तयार करा. आणि चेहऱ्यावर लावा, त्वचा चमकदार होण्यास मदत होईल

त्वचेचा निस्तेजपणा दूर करण्यासाठी काकडीचा फेस पॅक
त्वचेचा निस्तेजपणा दूर करण्यासाठी काकडीचा फेस पॅक (unsplash)

Cucumber Face Pack for Dull Skin: उन्हाळ्यात त्वचेची स्थितीही खराब होऊ लागते. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते.  सततचा घाम आणि धुळीमुळे त्वचा अनेकदा काळी आणि निस्तेज दिसू लागते. अशा परिस्थितीत विविध ब्युटी प्रोडक्टवर किंवा पार्लरमध्ये पैसे वाया घालवण्याऐवजी काकडीपासून बनवलेला फेस पॅक घरीच वापरून पहा. दोन ते तीन वापरानंतरच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर चमक दिसू लागेल. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या निस्तेजपणामुळे त्रस्त असाल तर हा फेस पॅक वापरून पहा. काकडीचा फेस पॅक तुमची त्वचा रिफ्रेश करण्यासोबतच निस्तेजपणा दूर करेल. काकडीमध्ये काही गोष्टी मिक्स करून लावल्याने त्याचा त्वचेला फायदा होतो. काकडीचा फेस पॅक कसा बनवायचा आणि कसा लावायचा जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

डेड स्किन काढण्यासाठी असा बनवा काकडीचा फेस पॅक

चेहऱ्यावर जास्त डेड स्किन असल्यास मुलतानी मातीसह काकडीचा फेस पॅक खूप प्रभावी आहे. काकडीच्या रसात दोन चमचे मुलतानी माती मिक्स करून फेस पॅक तयार करा आणि चेहऱ्याला लावा. हा पॅक सुकल्यानंतर चेहरा धुवा. यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. मुलतानी माती त्वचेवरील मृत त्वचा सहजपणे काढून टाकते. याव्यतिरिक्त काकडी त्वचेला आतून हायड्रेट करेल आणि फ्रेश दिसण्यास मदत करेल.

त्वचेवर जळजळ होत असेल आणि निस्तेजपणा दिसत असेल तर लावा काकडीचा फेस पॅक

जर तुम्हाला उष्णतेमुळे त्वचेवर जळजळ होत असेल आणि त्वचा कोरडी होत असेल तर काकडी आणि दहीचा फेस पॅक तुमच्यासाठी उत्तम आहे. हा पॅक बनवण्यासाठी काकडीची पेस्ट करा आणि त्यात दही मिक्स करा. हा फेस पॅक फक्त चेहऱ्यालाच नाही तर मानेलाही लावा. हे त्वचेचे छिद्र घट्ट करेल आणि ते हायड्रेट करेल. त्यामुळे त्वचेची जळजळ दूर होऊन चेहऱ्यावर चमक येईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel