Holi Care Tips: होळीला रंग खेळण्यापूर्वी त्वचा आणि केसांना लावा या ५ गोष्टी,साइड इफेक्ट्सपासून राहाल दूर
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Holi Care Tips: होळीला रंग खेळण्यापूर्वी त्वचा आणि केसांना लावा या ५ गोष्टी,साइड इफेक्ट्सपासून राहाल दूर

Holi Care Tips: होळीला रंग खेळण्यापूर्वी त्वचा आणि केसांना लावा या ५ गोष्टी,साइड इफेक्ट्सपासून राहाल दूर

Mar 24, 2024 01:03 PM IST

Pre Holi Skin and Hair Care Tips: बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक रंगांमुळे लोकांच्या त्वचेवर आणि केसांवर दुष्परिणाम होऊ लागतात तेव्हा होळीची मजा खराब होते. रंग खेळण्यापूर्वी त्वचा आणि केसांची काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या

होळीला रंग खेळण्यापूर्वी त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी टिप्स
होळीला रंग खेळण्यापूर्वी त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी टिप्स (unsplash)

Pre Holi Skin and Hair Care Tips: रंगीबेरंगी रंग आणि चविष्ट पारंपारिक मिठाईं शिवाय होळीचा सण अपूर्ण मानला जातो. या दिवशी लोक बॉलिवूड गाण्यांवर नाचतात आणि एकमेकांना रंग लावतात. होळीच्या रंगांच्या या मस्तीमुळेच लोक या सणाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र जेव्हा बाजारात उपलब्ध रासायनिक रंग लोकांच्या त्वचेवर आणि केसांवर दुष्परिणाम करू लागतात तेव्हा होळीची मजा लुप्त होऊ लागते. जर तुम्हाला हे दुष्परिणाम टाळायचे असतील तर होळी खेळण्यापूर्वी तुमची त्वचा आणि केस तयार करा. कसे ते जाणून घ्या

होळी खेळण्यापूर्वी चेहरा आणि केस अशा प्रकारे तयार करा

खोबरेल तेल

होळीच्या रासायनिक रंगांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी प्रथम चेहऱ्यावर खोबरेल तेल लावा. खोबरेल तेल त्वचेला मॉइश्चरायझ करून रंगांच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करण्यास मदत करते. एवढेच नाही तर चेहऱ्यावर खोबरेल तेल लावून होळीचे रंगही सहज काढता येतात. वास्तविक तेल लावल्याने त्वचेवर एक वरचा थर येतो, त्यामुळे होळीचा रंग त्वचेत खोलवर जात नाही आणि धुतल्यानंतर तो सहज स्वच्छ होतो. ही टिप फॉलो करण्यासाठी होळी खेळण्यापूर्वी १५ मिनिटे आधी चेहरा, मान, कान आणि केसांना खोबरेल तेल नीट लावा.

लिंबाचा रस

केसांना होळीचे रंग लावल्याने केस गळणे आणि कोंड्याची समस्या होऊ शकते. अशा परिस्थितीत ही समस्या दूर ठेवण्यासाठी लिंबाचा रस हा अतिशय प्रभावी उपाय आहे. हे केसांमधील कोंडा काढून टाकते आणि कोरडेपणा टाळते. केसांना होळीचे रंग लावल्यास मोहरीच्या तेलात लिंबाचा रस मिसळून लावा. तेल लावल्यानंतर एक तासाने शॅम्पू करा. हा उपाय केसांमधली रसायने काढून केसांना डीप कंडिशनिंग करण्यास मदत करेल.

स्कार्फने झाकून घ्या

होळीच्या रासायनिक रंगांमुळे तुमचे केस खडबडीत आणि खराब होऊ नयेत असे वाटत असेल तर होळी खेळण्यापूर्वी केस व्यवस्थित झाका. तुम्हाला हवे असेल तर वेणी घाला आणि त्यांना स्कार्फने गुंडाळा, त्यांना चांगले बांधा.

पेट्रोलियम जेली

तेलाशिवाय पेट्रोलियम जेलीही होळी खेळण्यापूर्वी चेहऱ्यावर लावता येते. पेट्रोलियम जेली त्वचेवर जाड थर तयार करते. त्यामुळे रंगांमुळे त्वचेला जास्त नुकसान होत नाही. होळी खेळण्यापूर्वी चेहऱ्यावर पेट्रोलियम जेली लावल्याने होळीचा रंग सहज निघतो. पेट्रोलियम जेली केवळ चेहऱ्यावरच नाही तर मान, कान, हात आणि नखांवरही लावता येते.

एलोवेरा

होळी खेळण्यापूर्वी एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावणे हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. कोरफडीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवर अतिरिक्त थर तयार होतो. त्यामुळे होळीच्या रंगांचा त्वचेवर फारसा परिणाम होत नाही. एलोवेरा चेहऱ्यावर लावल्याने मुरुम आणि लालसरपणा टाळता येतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner