Skin Brightening Pack: सकाळ-संध्याकाळ लावा हे दोन फेस पॅक, चेहऱ्यावर येईल चमक
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Brightening Pack: सकाळ-संध्याकाळ लावा हे दोन फेस पॅक, चेहऱ्यावर येईल चमक

Skin Brightening Pack: सकाळ-संध्याकाळ लावा हे दोन फेस पॅक, चेहऱ्यावर येईल चमक

Dec 20, 2023 01:08 PM IST

Natural Face Pack: तुमच्या चेहरा जर डल आणि निस्तेज दिसत असेल तर ते तुमचा पूर्ण लूक खराब करतात. तुम्हाला चेहऱ्यावर चमक हवी असेल तर हे दोन फेस पॅक वापरा.

चेहऱ्यावर चमक मिळवण्यासाठी फेस पॅक
चेहऱ्यावर चमक मिळवण्यासाठी फेस पॅक

Face Pack for Skin Brightening: लग्नाचा सीझन सुरु आहे. अशा वेळी जर तुमचा चेहरा डल आणि निस्तेज दिसत असेल तर ते तुमचा लूक खराब करू शकते. लग्नाच्या सीझनमध्ये फक्त नवरीच नाही तर इतर महिलांना देखील आपल्या चेहऱ्यावर गुलाबी ग्लो हवा असतो. तुम्हाला सुद्धा चेहऱ्यावर चमक हवी असेल तर फेसवॉशऐवजी हे दोन फेस पॅक वापरा. रोज सकाळी आणि संध्याकाळी हे फेस पॅक लावल्याने तुम्हाला काही दिवसात चेहऱ्यावर चमक आणि गोरापणाही दिसून येईल. शिवाय मुलींना पार्लरमध्ये महागडे ट्रीटमेंट घेण्याची गरज पडणार नाही. विशेष म्हणजे हे फेस पॅक फक्त मुलींसाठी नाही तर मुलांसाठी सुद्धा तेवढेच प्रभावी आहेत. जाणून घ्या हे दोन फेस पॅक कोणते आहेत आणि ते कसे बनवायचे.

दही आणि कॉफीचा नैसर्गिक स्क्रब

दररोज रात्री झोपण्यापूर्वी या नैसर्गिक स्क्रबच्या मदतीने त्वचेला मसाज करा आणि पाण्याने चेहरा स्वच्छ करा. हे स्क्रब तुमची डेड स्किन काढून टाकण्यास तसेच त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चराइझ करण्यात मदत करेल.

असा बनवा हा नॅचरल स्क्रब

एका बाऊल मध्ये एक ते दोन चमचे दही घ्या आणि त्यात चिमूटभर कॉफी घाला. हे चांगले मिक्स करून पेस्ट बनवा. आता या स्क्रबच्या मदतीने चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. सुमारे २० मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेला ग्लो येण्यास मदत होईल.

तांदळाचे पीठ आणि गव्हाच्या पिठापासून बनवा फेस पॅक

दररोज सकाळी फेसवॉश वापरण्याऐवजी या फेस पॅकच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. चेहऱ्यावर गोरापणा आणि चमक येईल.

असा बनवा फेस पॅक

एका वाटीत एक चमचा तांदळाचे पीठ आणि एक चमचा गव्हाचे पीठ घेऊन मिक्स करा. नंतर कच्च्या दुधाच्या मदतीने घट्ट पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. साधारण २० मिनिटे हे चेहऱ्यावर राहू द्या. ठराविक वेळेनंतर हलक्या हाताने मसाज करा आणि चेहरा पाण्याने स्वच्छ करा.

 

हे दोन फेस पॅक रोज सकाळी आणि संध्याकाळी लावल्याने काही दिवसातच चेहऱ्याचा रंग पूर्णपणे बदलून जाईल आणि त्वचेवर एक अप्रतिम चमक येईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner