मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Face Pack: हायपरपिग्मेंटेशनमुळे चेहरा काळा दिसतोय? समस्या दूर करण्यासाठी लावा हे फेस पॅक

Face Pack: हायपरपिग्मेंटेशनमुळे चेहरा काळा दिसतोय? समस्या दूर करण्यासाठी लावा हे फेस पॅक

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 20, 2024 01:29 PM IST

Homemade Face Pack: वाढत्या वयानुसार तुमच्या चेहऱ्यावर काळे आणि ब्राउन पॅच तयार होत असतील तर तुम्हाला ताबडतोब त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हे २ फेस पॅक लावू शकता.

त्वचेचे हायपरपिग्मेंटेशन दूर करण्यासाठी फेस पॅक
त्वचेचे हायपरपिग्मेंटेशन दूर करण्यासाठी फेस पॅक (unsplash)

Face Pack for Hyperpigmentation Skin: वाढत्या वयाबरोबर लोकांना त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. या काळात चेहऱ्यावर डाग आणि सुरकुत्या पडणे हे देखील एक सामान्य समस्या आहे. या सामान्य समस्यांमध्ये हायपरपिग्मेंटेशनचा देखील समावेश होते. यामध्ये त्वचेचा काही भाग जास्त डार्क तर कधी काळा दिसू लागतो. अनेक वेळा हा त्रास खूप वाढतो. याला सामोरे जाण्यासाठी तुम्ही काही घरगुती फेस पॅक लावू शकता. हायपरपिग्मेंटेशनची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हे २ होममेड फेस पॅक ट्राय करू शकता.

जवसाच्या बियांचा फेस पॅक

हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला जवस म्हणजे फ्लेक्स सीडचे जेल आणि तांदळाच्या पिठाची आवश्यकता आहे.

कसा बनवायचा फेस पॅक

हा फेस पॅक बनवण्यासाठी २ टेबलस्पून फ्लेक्स सीड्स एक ग्लास पाण्यात १५ मिनिटे उकळा. नंतर त्याचे जेल गाळून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही २ चमचे फ्लेक्स सीड्स एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवू शकता. नंतर तयार केलेल्या जेलमध्ये २ चमचे तांदळाचे पीठ घाला. हे चांगले मिक्स करा आणि फेस पॅक बनवा. आता हे चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटे राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुवा.

मसूर डाळीचे फेस पॅक

मसूरच्या डाळीचे फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला मसूरची डाळ, चंदन पावडर, जंगली हळद आणि दूध आवश्यक आहे.

कसा बनवायचा फेस पॅक

हा फेस पॅक बनवण्यासाठी एक कप दुधात २ चमचे मसूर डाळ घाला. नंतर हे थोडा वेळ भिजवा. तासभर भिजल्यावर ते बारीक करून घ्या. आता त्यात चंदन पावडर आणि हळद मिक्स करा. हे सर्व नीट मिक्स करून फेस पॅक बनवा. आता हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि साधारण १५ ते २० मिनिटे राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुवा. नियमित वापराणे परिणाम दिसेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग