मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Oiling in Belly Button: बेंबीत लावा हे ४ प्रकारचे तेल, कोरडी त्वचा आणि ओठही होतील सॉफ्ट

Oiling in Belly Button: बेंबीत लावा हे ४ प्रकारचे तेल, कोरडी त्वचा आणि ओठही होतील सॉफ्ट

Hiral Shriram Gawande HT Marathi
Dec 31, 2023 12:16 PM IST

Winter Skin Care Tips: त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी नाभीमध्ये तेल लावण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी कोणते तेल लावावे आणि त्याचा काय फायदा होतो हे जाणून घ्या.

नाभीमध्ये तेल लावण्याचे फायदे
नाभीमध्ये तेल लावण्याचे फायदे (unsplash)

Benefits of Oiling in Belly Button: हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे हे सामान्य आहे. पण कधी कधी हा त्रास इतका वाढतो की त्वचेला बाहेरून मॉइश्चरायझिंग करूनही कोरडेपणा दूर होत नाही. तीच परिस्थिती ओठांचीही असते. हिवाळ्यात ओठांवरचे भेगा दूर होत नसतील तर रोज हे तेल नाभीला लावल्याने फायदा होतो. दररोज बेंबीमध्ये हे ४ प्रकारचे तेल लावल्याने शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर फायदा होतो. असे केल्याने टाचांच्या भेगाही बऱ्या होतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये तेल लावल्याने कोरड्या त्वचेपासून सुटका होते. फाटलेले ओठ असो वा कोरडी त्वचा किंवा फाटलेल्या टाचा या समस्या सोडवण्यासाठी बेंबीमध्ये तेल लावणे उपयुक्त ठरते. जाणून घ्या कोणत्या समस्येमध्ये कोणते तेल लावणे फायदेशीर आहे.

फाटलेल्या ओठांसाठी मोहरीचे तेल

जर तुम्हाला ओठ फाटल्यामुळे त्रास होत असेल आणि लिप बामचाही काही परिणाम होत नसेल तर यासाठी बेबींमध्ये मोहरीचे तेल लावा. रोज रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये शुद्ध मोहरीचे तेल लावा. हे तेल रोज नाभीत लावल्याने काही दिवसातच फाटलेल्या ओठांची समस्या पूर्णपणे दूर होईल.

भेगा पडलेल्या टाचांसाठी लावा खोबरेल तेल

कोरड्या आणि फाटलेल्या टाचांचा त्रास होतो. शिवाय टाचांवर भेगा पडल्या आणि त्या लवकर बऱ्या होत नसतील तर अशा वेळी रोज रात्री झोपण्यापूर्वी बेबींमध्ये खोबरेल तेल लावा. नाभीमध्ये दररोज नारळाचे तेल लावल्यास टाचांच्या भेगांपासून आराम मिळेल.

ड्राय स्किनसाठी लावा तिळाचे तेल

जर तुमची त्वचा आणि केस कोरडे झाले असतील आणि तुम्ही या समस्येने त्रस्त असाल तर तिळाचे तेल फायदेशीर आहे. अनेक मॉइश्चरायझर आणि तेल तुमच्या त्वचा आणि केसांचा कोरडेपणा दूर करू शकत नसेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये तिळाचे तेल लावा. केसांना रेशमी आणि चमकदार बनवण्यासोबतच त्वचेलाही चमक येईल.

 

दृष्टी सुधारण्यासाठी लावा ऑलिव्ह ऑईल

रोज रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये ऑलिव्ह ऑईल लावल्यास दृष्टी सुधारण्यास मदत होते. त्वचेच्या समस्या लक्षात घेऊन दररोज नाभीमध्ये हे तेल लावा. त्याचा परिणाम काही दिवसातच दिसून येईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel