Face Pack for Instant Glow: हिवाळ्यात फक्त कोरड्या त्वचेची समस्या होत नाही तर ड्राय स्किनमुळे चेहरा निस्तेज दिसतो. तसेच यामुळे सुरकुत्याही दिसू लागतात. ज्यामुळे कमी वयात तुम्ही म्हातारे दिसू लागतात. अशा वेळी कितीही ब्युटी प्रोडक्ट लावली तरी त्यांच्या चेहऱ्यावर चमक येत नाही. जर तुम्हाला त्वचेच्या कोरडेपणा आणि निर्जीवपणाचा त्रास होत असेल आणि मकर संक्रांतीच्या पूर्वी चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो हवा असेल तर लगेचच हा फेस पॅक लावा. ओट्सचा हा फेस पॅक नॅचरल स्क्रब म्हणून काम करते.
चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो येण्यासाठी ओट्स आणि दही घालून फेस पॅक बनवा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावण्याचे अनेक फायदे आहेत.
- ओट्स त्वचेला नैसर्गिकरीत्या मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. जर त्वचा खूप कोरडी असेल तर त्यावर ओट्सचा फेस पॅक लावल्यास त्याचा परिणाम दिसून येतो.
- तसेच ओट्स त्वचेला डील क्लीन करतात. तसेच जमा झालेली डेड स्किनही काढून टाकते. त्यामुळे त्वचा स्वच्छ दिसू लागते.
- उन्हामुळे चेहरा टॅन झाला असेल तर ओट्स लावल्याने फायदा होतो. हे टॅनिंग दूर करते आणि चेहऱ्यावर चमक आणते.
- चेहऱ्यावर अतिरिक्त तेल तयार होत असेल तर ओट्स ते दूर करते. ज्यामुळे मुरुमांपासूनही आराम मिळतो.
ओट्स फेस पॅकने चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो हवा असेल तर अशा पद्धतीने बनवा फेस पॅक
- रात्री दोन चमचे दह्यात एक चमचा ओट्स भिजवा.
- दुसऱ्या दिवशी दह्यात भिजवलेले ओट्स चांगले मॅश करून त्यात एक चमचा मिल्क पावडर किंवा कच्चे दूध टाका.
- आता हा नैसर्गिक स्क्रब फेस पॅक चेहऱ्यावर लावा.
- साधारण १०-१५ मिनिटे हलक्या हातांनी मसाज करा. मसाज केल्याने त्वचेवर जमा झालेली डेड स्किन सहज निघून जाईल.
- त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
- असे केल्याने त्वचेवर साचलेली घाण आणि डेड स्किन साफ होईल आणि चेहरा मॉइश्चरायझ होऊन चमकू लागेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)