मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Fall Solution: पातळ केसांचा त्रास दूर करण्यासाठी लावा आयुर्वेदिक टोनर, हेअर फॉलही होईल कमी

Hair Fall Solution: पातळ केसांचा त्रास दूर करण्यासाठी लावा आयुर्वेदिक टोनर, हेअर फॉलही होईल कमी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 29, 2024 11:40 AM IST

Ayurveda Tips: केस कमकुवत होईल तुटू लागतात. त्यामुळे केस गळती आणि पातळ केसांची समस्या निर्माण होते. तुम्हाला सुद्धा ही समस्या असेल तर तुम्ही घरी हे आयुर्वेदिक टोनर बनवून वापरू शकता.

हेअर फॉल आणि पातळ केसांची समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदिक टोनर
हेअर फॉल आणि पातळ केसांची समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदिक टोनर (unsplash)

Ayurvedic Toner for Thin Hair: केस गळणे आणि पातळ होणे ही समस्या आजकाल सामान्य आहे. अनेकदा शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे किंवा जास्त स्ट्रेसमुळे केस गळतात. तर कधी कधी केमिकल असलेले हेअर प्रोडक्ट केस कमकुवत होण्याचे आणि गळतीचे मुख्य कारण आहेत. तुम्हाला सुद्धा केस गळण्याची समस्या असेल तर तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीची मदत घेऊ शकता. घरच्या घरी आयुर्वेदिक टोनर बनवून तुम्ही पातळ केसांच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. जाणून घ्या हे आयुर्वेदिक टोनर कसे बनवायचे आणि वापरायचे.

पातळ केस दाट करेल हा आयुर्वेदिक टोनर

निसर्गोपचार डॉक्टर मनोज यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर नैसर्गिक पद्धतीने केस कसे दाट करायचे हे सांगितले आहे. याच्या मदतीने केस गळणे देखील थांबेल आणि पातळ केसांची समस्या देखील दूर होईल. यासाठी फक्त ६ गोष्टी आवश्यक आहेत. यातील बहुतेक गोष्टी तुमच्या किचनमध्ये सहज उपलब्ध असतील.

कसा बनवायचा आयुर्वेदिक टोनर

आयुर्वेदिक टोनर बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- अमरबेल १०० ग्रॅम

- जास्वंदाच्या फुलांची पावडर १५ ग्रॅम

- जटामांसी १०० ग्रॅम

- लवंग १५-२०

- मेथी दाणे १०० ग्रॅम

- तांदूळ १०० ग्रॅम

या सर्व गोष्टी एका खोल भांड्यात दोन लिटर पाण्यात मिक्स करा. जर तुमच्याकडे जास्वंदाच्या फुलांची पावडर नसेल तर तुम्ही त्यात ताजी जास्वंदाचे फुलं वापरू शकता. यासाठी सुमारे ५० फुले लागतील. या सर्व गोष्टी दोन लिटर पाण्यात टाकून तोपर्यंत उकळा जोपर्यंत पाणी निम्मे होत नाही. जेणेकरून सर्व औषधी वनस्पतींचे घटक पाण्यात विरघळतील. आता हे तयार पाणी गाळून काचेच्या बरणीत भरा.

कसे लावावे आयुर्वेदिक टोनर

हे तयार केलेले टोनर केसांवर लावणे खूप सोपे आहे. तयार टोनर रोज केसांच्या मुळांवर स्प्रे करा. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हलके मालिश करू शकता. दररोज केस शॅम्पूने धुण्याची गरज नाही. हे टोनर केस दाट होण्यास मदत करेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग