मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Open Pores: चेहऱ्यावर ओपन पोर्स दिसतायत? दूर करेल एलोवेरा जेलने बनवलेला हा फेस पॅक

Open Pores: चेहऱ्यावर ओपन पोर्स दिसतायत? दूर करेल एलोवेरा जेलने बनवलेला हा फेस पॅक

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 27, 2024 08:11 PM IST

Open Pores Face Pack: चेहऱ्यावर दिसणारी सैल त्वचा ही कधी कधी ओपन पोर्स मोठे झाल्यामुळे दिसते. ही ओपन पोर्स मोठ्या खड्ड्यांसारखी दिसतात. हे दूर करण्यासाठी एलोवेरासोबत या गोष्टी मिक्स करून लावा.

ओपन पोर्स कमी करण्यासाठी एलोवेरा जेलचा फेस पॅक
ओपन पोर्स कमी करण्यासाठी एलोवेरा जेलचा फेस पॅक

Aloe Vera Gel Face Pack: चेहऱ्यावर खूप लहान लहान छिद्र असतात, जे त्वचेला श्वास घेण्यास आणि आवश्यक पोषक तत्व प्रदान करण्यास मदत करतात. या छिद्रांच्या खाली तेल ग्रंथी देखील असतात. जे त्वचेवर तेल काढतात. अनेक वेळा या तैल ग्रंथींच्या अति उत्पादनामुळे छिद्रे खूप मोठी दिसू लागतात आणि चेहऱ्यावर खड्ड्यांसारखी दिसू लागते. ही पोर्स कुरूप दिसतात आणि त्वचेला ढिलेपणा आणतात. ओपन पोर्स कमी करायचे असतील तर हा घरगुती फेस पॅक लावा. त्याचा परिणाम काही दिवसातच दिसून येईल.

ओपन पोर्स कमी करण्यासाठी प्रभावी घरगुती फेस पॅक:

हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- एक चमचा एलोवेरा जेल,

- अर्धा चमचा खोबरेल तेल,

- अर्धा चमचा अगर-अगर पावडर

एका काचेच्या बाउलमध्ये एक चमचा एलोवेरा जेल आणि अर्धा चमचा खोबरेल तेल घ्या. आता त्यात अगर-अगर पावडर मिक्स करून घट्ट पेस्ट तयार करा. अगर-अगर हे बाजारात व्हेज जिलेटिनच्या नावाने उपलब्ध होईल. या तिन्ही गोष्टींचा एक पॅक बनवा आणि ते ओपन पोर्सवर आणि चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासानंतर ते सुकल्यावर पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

किती वेळा लावावा एलोवेरा जेलपासून बनवलेला फेस पॅक

हा फेस पॅक आठवड्यातून एकदाच लावा. एकदाच लावल्यानंतर ओपन पोर्स लक्षणीयरीत्या संकुचित दिसतील. हा फेस पॅक तुम्ही सतत लावल्यास काही आठवड्यांनंतर चेहऱ्याच्या त्वचेवर फरक दिसून येईल आणि वाढलेली छिद्रे लहान आणि आकुंचन पावतील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग