Side effects of apple: सफरचंदांबद्दल एक म्हण नेहमी ऐकली जाते की, रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्ही डॉक्टरकडे जाण्यापासून वाचू शकता. लहानपणापासून तुम्हीही सफरचंद खाण्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे ऐकले असतील. सफरचंदात असलेले व्हिटॅमिन, फायबर, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. पण तुम्हाला माहित आहे का की, सफरचंद सेवनाने सर्वांनाच फायदा होत नाही. होय, हे खरं आहे. काही लोकांनी सफरचंदाचे सेवन सावधगिरीने करावे. अथवा त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.
काही लोकांना सफरचंद खाण्याची ॲलर्जी असू शकते. अशा लोकांना सफरचंद खाल्ल्यानंतर त्वचेवर खाज सुटणे, पुरळ येणे आणि सूज येण्याचा त्रास होऊ शकतो. तुम्हालाही सफरचंद खाण्याची ॲलर्जी असेल तर चुकूनही त्याचे सेवन करू नका.
ज्यांना आधीच लठ्ठपणाचा त्रास आहे, त्यांनी जास्त प्रमाणात सफरचंद खाणे टाळावे. सफरचंदमध्ये जास्त प्रमाणात कॅलरी आणि साखरेचे प्रमाण असल्याने तुमचे वजन आणखी वाढू शकते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सफरचंदाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
अतिसाराचा त्रास असलेल्या लोकांनीदेखील सफरचंद जास्त प्रमाणात खाऊ नये. सफरचंदात असलेले फायबर आतड्याची हालचाल वाढवते. त्यामुळे सफरचंदाचे जास्त सेवन केल्याने डायरिया म्हणजेच अतिसारची समस्या आणखी वाढू शकते.
मधुमेहाच्या रुग्णांनीही सफरचंदाचे जास्त सेवन करू नये. सफरचंदांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणखी वाढते. मधुमेहाच्या रुग्णांनी सफरचंदाचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.
जे लोक आधीच पचनाच्या समस्यांनी त्रस्त आहेत, त्यांनी जास्त प्रमाणात सफरचंद खाणे टाळावे. यामध्ये असणारे फायबर पचनसंस्था निरोगी ठेवतात. पण जर सफरचंद जास्त प्रमाणात खाल्ल्यास गॅस, पोटदुखी आणि पोटात मुरड मारणे असे त्रास होऊ शकतात.
सफरचंदात पोटॅशियम, फायबर, लोह, कार्बोहायड्रेट्स आणि मॅग्नेशियमचे भरपूर प्रमाण असते. रिपोर्ट्सनुसार असे सांगण्यात येते की याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळीदेखील वाढू शकते. त्यामुळे जास्त प्रमाणात खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.
सरासरी एक व्यक्ती दिवसातून एक ते दोन सफरचंद खाऊ शकते. जर तुम्ही यापेक्षा जास्त सफरचंद खात असाल तर, तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. सफरचंद जास्त प[प्रमाणात खाल्य्याने तुम्हाला विविध परिणाम दिसू शकतात.