Makar Sankranti festival in foreign countries: आज भारतात सगळीकडे मकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक नावांनी साजरा केला जातो. याला उत्तरायण असेही म्हंटल जाते.. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मकर संक्रांतीला सकाळी लवकर स्नान करण्याचे आणि दानाचेही खूप महत्त्व असते. भारतातून लोक लांबून येऊन गंगेत स्नान करतात. भारतात हा सण नव्या ऋतूच्या आगमनाचेही प्रतीक मानला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो असं म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का की हा सण केवळ भारतातच नाही तर इतर काही देशातही साजरा केला जातो. चला जाणून घेऊया मकर संक्रांतीचा सण कोणत्या देशात साजरा केला जातो.
म्यानमार या देशात मकर संक्रांती हा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. तिकडे हा सण थिनाग्यान या नावाने साजरा केला जातो. विशेष म्हणजे हा सण तिकडे ३ ते ४ दिवस चालतो. खरतर नवीन वर्षाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी येथे मकर संक्रांत साजरी केली जाते, असे मानले जाते.
श्रीलंका हा भारताचा शेजारी सणही मकर संक्रांत साजरी करतो. तिकडे मकर संक्रांती सण साजरा करण्यासाठी एक वेगळी परंपरा फॉलो केली जाते. श्रीलंकेत मकर संक्रांतीला उजहावर थिरानाल म्हणून ओळखले जाते. इथले काही लोक या सणाला पोंगल असेही म्हणतात. याचे कारण श्रीलंकेत तामिळनाडूचे लोक मोठ्या संख्येने राहतात.
थायलंडमध्येही मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. हे थायलंडमध्ये हा सण सॉन्कर्ण म्हणून ओळखला जातो. असे म्हंटले जाते की आधीच्या काळात थायलंडमधील प्रत्येक राजाकडे स्वतःचा खास पतंग होता. केवळ राजेच नाही तर थायलंडचे लोकही देवाला प्रार्थना करण्यासाठी पतंग उडवत असत.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)