Health Benefits of Almond Milk: अनुष्का शर्मा तिच्या फिटनेसबाबत खूप सजग आहे. पहिल्या प्रेग्नेंसीनंतरचा तिचा फिटनेसने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. अनुष्काच्या दुसऱ्या बाळाची बातमी आल्यानंतर त्यांचे चॅट व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती तिच्या फिटनेसचे रहस्य सांगताना दिसत आहे. एका मुलाखतीत अनुष्का शर्माने सांगितले होते की ती रेग्युलर दूध पीत नाही तर बदामाचे दूध पिते. जे घरी बनवायला खूप सोपे आहे. बदामाचे दूध हे प्लांट बेस्ड प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहे आणि ते पिण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. बदामचे दूध पिण्याचे फायदे आणि ते घरी बनवावे हे जाणून घ्या.
- बदामाचे दूध हे वीगन डायट फॉलो करण्यासोबतच प्लांट बेस्ड प्रोटीनचे समृद्ध स्रोत आहे. अशा स्थितीत बदामाचे दूध प्यायल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढत नाही. तसेच ते प्यायल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
- जे लोक आपल्या आहारात कॅलरीजबाबत जास्त सावध असतात त्यांच्यासाठी बदामाचे दूध खूप फायदेशीर आहे. बदामाच्या दुधात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे बेस्ट आहे. हे दूध रोज प्यायल्याने वजन कमी करण्यासाठी फायदा होईल.
- मधुमेहाचे रुग्ण सहजपणे बदामाचे दूध पिऊ शकतात. ते प्यायल्याने रक्तातील साखर वाढण्याचा धोका नसतो.
- बदामाच्या दुधात सर्व आवश्यक पोषक घटक असतात. यामध्ये व्हिटॅमिन ई तसेच अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला पोषण मिळण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते.
घरच्या घरी बदामाचे दूध बनवण्यासाठी ५-६ बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी सर्व बदामांची साल काढून टाका. नंतर अर्धा ग्लास पाण्यात मिसळून मिक्सरमध्ये चांगले वाटून घ्या. आता हे बदामाचे मिश्रण गाळून घ्या. तुमचे बदाम दूध तयार आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चवीसाठी त्यात खजूर सुद्धा मिक्स करू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)