Vamika Kohli Diet: पालकत्वासंदर्भात कोणती ना कोणती रील सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असते. मुलांचे चांगले संगोपन करणे ही पालकांची सर्वात मोठी जबाबदारी असते. अलीकडेच, बॉलिवूडच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या पालकत्वाचे रहस्य देखील चाहत्यांसमोर आले आहे. ज्याचा खुलासा स्वतः अनुष्का शर्माने एका मुलाखतीदरम्यान केला आहे. नुकतंच लंडनहून भारतात परतलेल्या अनुष्काने एका मुलाखतीत मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांचे संगोपन करताना, ती आणि विराट कठोर निरोगी जीवनशैलीचे पालन कसे करतात हे सांगितले.
नुकतंच लंडनहून भारतात परतलेल्या अनुष्का शर्माने मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात तिच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने संवाद साधला. अनुष्काने सांगितले की, ती तिच्या कुटुंबासाठी कठोर दिनचर्या पाळते. ती पुढे म्हणाली की, सततच्या प्रवासामुळे त्यांच्या मुलांनाही अनेक नवीन बदल जाणवतात. असे असूनही, आपल्या मुलांना शिस्तीत ठेवण्यासाठी, ती त्यांच्या वेळेनुसार दिनचर्या पाळते, जेणेकरून त्यांची दोन्ही मुले निरोगी तर राहतीलच शिवाय शिस्तबद्धही राहतील. उदाहरण द्यायचे झाले तर, वामिका आणि अकाय यांची खाण्याची एक निश्चित वेळ आहे. आणि ते त्या ठराविक वेळीच जेवतात आणि झोपतात.
अनुष्काने सांगितले की, ती तिच्या दोन्ही मुलांसाठी कठोर निरोगी जीवनशैलीचे पालन करते. त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे, ते कुठेही असले तरीही, त्यांची मुले नेहमी एकाच वेळी जेवतात आणि झोपतात. अनुष्का आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी हा नियम आवश्यक मानते. अनुष्काने सांगितले की, ती तिची मुलगी वामिकाला संध्याकाळी ५.३० वाजता जेवायला लावते आणि तिला लवकर झोपायला सांगते. अनुष्काने सांगितले की, ती मुलांसोबत स्वतःही हेच नियम पाळते.
अनुष्काने सांगितले की, संध्याकाळी लवकर जेवण करून आणि वेळेवर झोपल्यामुळे तिने तिच्या जीवनशैलीत आणि आरोग्यामध्ये अनेक सकारात्मक बदल अनुभवले आहेत. ती म्हणाली, 'मला असे केल्याने अनेक फायदे जाणवतात - मला चांगली झोप येते, सकाळी उठल्यावर मला पूर्वीपेक्षा अधिक फ्रेश वाटते आणि ब्रेन फ्रॉगसारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.'
या मुलाखतीदरम्यान अनुष्काने पारंपारिक खाद्यपदार्थांबद्दल बोलताना अनेक गोष्टी शेअर केल्या. तिने सांगितले की, ती आणि पती क्रिकेटर विराट कोहली त्यांच्या मुलांसाठी स्वतः जेवण बनवतात. ते असे करतात जेणेकरुन त्यांच्या मुलांद्वारे ते त्यांच्या पारंपारिक अन्नाची चव पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकतील. अनुष्का सांगते की, तिच्या आईच्या जेवणाची चव मुलांना देण्यासाठी ती अनेकदा फोनवरून त्याची रेसिपी मागवते.
अनुष्का शर्मा म्हणते की, आजकाल परफेक्ट पालक होण्यासाठी पालकांवर खूप दबाव असतो. परंतु आपण हे समजून घेतले पाहिजे की, कोणतीही व्यक्ती परिपूर्ण असूच शकत नाही. आणि त्यात काहीही चुकीचे नाही. अनुष्का म्हणते की, आजकाल परफेक्ट पॅरेंटिंगशी संबंधित अनेक सल्ले सोशल मीडियावर दिले जातात, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलासोबत काय चूक करत आहात हे सांगितले जाते.
हे सर्व सल्ले कधीकधी तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. अशा स्थितीत अनुष्का शर्मा म्हणते की, सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या व्हिडिओंना आंधळेपणाने फॉलो करण्यापेक्षा तुमच्या पालकत्वाशी खऱ्याने राहणे चांगले. तुमच्या चुका तुमच्या मुलांना मांडणे किंवा पटवून देणे खूप महत्त्वाचे आहे. असे केल्याने मुलांवरील दबावही कमी होतो.