Skin Care Routine to Stay Young: त्वचा नेहमी चमकदार आणि तरुण दिसावी असे प्रत्येकाला वाटत असते. तुम्हालाही असे वाटत असेल तर स्किन केअर रुटीनमध्ये काही गोष्टींचा जरूर समावेश करा. यात टोनर, मॉइश्चरायझर सारख्या गोष्टींचा समावेश नाही तर या ३ गोष्टी आहेत. ज्यामुळे तुमची त्वचा फक्त बराच काळ तरुण दिसणार नाही तर सुरकुत्या देखील टाळतात. अनेक वेळा काही गोष्टींची नीट काळजी घेतली नाही तर कमी वयात चेहऱ्यावर फाईन लाइन्स सुरकुत्या दिसू लागतात. हे टाळण्यासाठी महिला आणि पुरुष दोघंही हे स्किन केअर रुटीन फॉलो करू शकतात. फेस वॉशच्या मदतीने चेहरा स्वच्छ करणं गरजेचं आहे. हे चेहऱ्यावरील घाण काढून टाकण्यास आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. याशिवाय या ३ गोष्टी चेहऱ्यावर लावायला विसरू नका.
सकाळी फेस वॉश केल्यानंतर चेहऱ्यापासून मानेपर्यंत सनस्क्रीन लावा. हे आपल्यासाठी मॉइश्चरायझरचे काम देखील करेल. सनस्क्रीन सूर्याच्या अतिनील किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करते. अतिनील किरणांमुळे त्वचेवरील वृद्धत्वाला वेग येतो. त्यामुळे त्वचा दीर्घकाळ तरुण दिसायची असेल तर उन्हात कमीत कमी बाहेर पडा आणि सनस्क्रीन लावूनच बाहेर पडा.
रेटिनॉल हा रेटिनोइडचा एक प्रकार आहे जो व्हिटॅमिन ए पासून बनविला जातो. हे रेटिनॉल त्वचेच्या आत जाऊन फ्री रॅडिकल्स काढून टाकते आणि त्वचेत इलास्टिन आणि कोलेजनचे उत्पादन वाढवते. ज्यामुळे त्वचेतील बारीक रेषा, सुरकुत्या आणि मोठी छिद्रे कमी होतात. रात्री झोपण्यापूर्वी रेटिनॉल बेस्ड क्रीम लावा. यामुळे त्वचा तरुण राहण्यास मदत होईल.
डोळ्यांच्या सभोवतालची त्वचा अतिशय संवेदनशील आणि मऊ असते. सर्वप्रथम या ठिकाणची लवचिकता संपते. अशा वेळी डोळ्यांच्या सभोवतालच्या त्वचेची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. रोज डोळ्यांभोवती अंडर आय क्रीम लावा. यामुळे तुम्ही तरुण दिसण्यास मदत होईल. रोज रात्री झोपण्यापूर्वी अंडर आय क्रीम लावा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)