Skin Care With Makhana: वाढत्या वयाबरोबर त्वचेवर त्याचा परिणाम दिसू लागतो. त्वचा कोरडी आणि कडक होऊ लागते. तर लहान मुलांची त्वचा पूर्णपणे मऊ आणि प्लम्पी असते. तुमच्या वयानुसार तुमच्या त्वचेवर लहान मुलांच्या त्वचेसारखी चमक आणि मुलायमपणा हवा असेल, तर हायलुरोनिक अॅसिड वापरण्याचा सल्ला दिला जातो. परंतु ही हायलुरोनिक अॅसिड उत्पादने खरेदी करणे प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसते. अशा परिस्थितीत मखाना वापरून हायलुरोनिक अॅसिड सहज मिळू शकता. जे त्वचा सॉफ्ट आणि ग्लोइंग बनवण्यास मदत करेल. स्किन केअरसाठी मखाना कसा वापरावा हे जाणून घ्या.
हायलुरोनिक अॅसिड त्वचा, शरीराचे सांधे आणि डोळ्यांमध्ये आढळते. जे शरीरात नैसर्गिकरित्या तयार होते. हायलुरोनिक अॅसिड नैसर्गिकरित्या त्वचेतील पाणी वाचवते. त्यामुळे त्वचेमध्ये चमक येते आणि त्वचा मुलायम राहते. यामुळे सुरकुत्या पडत नाहीत. हायलुरोनिक अॅसिड नैसर्गिकरित्या मिळविण्यासाठी मखानाचा वापर केला जाऊ शकतो.
त्वचा सॉफ्ट आणि ग्लोइंग बनवण्यासाठी मखानाचा वापर करावा याबाबत निसर्गोपचार डॉक्टर मनोज दास यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर सांगितले आहे. मखानाच्या मदतीने त्वचेला नैसर्गिकरित्या हायड्रेट केले जाऊ शकते आणि हायलुरोनिक अॅसिडसह टोनर बनवता येते. ते तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त या ३ स्टेप्स फॉलो करणे आवश्यक आहे.
- सर्वप्रथम १५-२० मखाना एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा.
- हे मखाना ३ ते ४ दिवस भिजत राहू द्या. सतत ओले राहिल्याने मखानातील घटक पाण्यात शोषले जातात आणि पाणी चिकट
व घट्ट होते.
- हे घट्ट आणि चिकट पाणी हायलुरोनिक अॅसिड समृद्ध टोनर आहे.
- आता हे स्वच्छ बॉटलमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा.
- रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर स्प्रे करा आणि अप्लाय करा.
- काही दिवसांच्या वापरानंतर तुम्हाला दिसेल की त्वचेवरील वृद्धत्वाचा प्रभाव कमी होऊ लागला आहे आणि चेहरा पूर्णपणे मऊ दिसत आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)