मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Viral Video: महिला प्रवाशाकडून पैसे उकळण्यासाठी कॅब ड्रायव्हरची कारमध्ये आत्महत्येची धमकी!

Viral Video: महिला प्रवाशाकडून पैसे उकळण्यासाठी कॅब ड्रायव्हरची कारमध्ये आत्महत्येची धमकी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 28, 2024 11:26 AM IST

Anisha Dixit: अनिशा दीक्षित या इंफ्युन्सरने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्यासोबत आलेला कॅब ड्रायव्हरचा अनुभव शेअर केला आहे. तो किस्सा सांगून तिने नेटिझन्सना एक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला आहे.

Woman posts video about cab driver trying to scam her with shocking requests, others say it's happened with them too
Woman posts video about cab driver trying to scam her with shocking requests, others say it's happened with them too (@anishadixit/ Instagram )

Cab Driver Scam: इंफ्युन्सर अनिशा दीक्षितने एका कॅब ड्रायव्हरसोबतचा झालेला तिचा अलीकडीलचा एका अनुभव इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करून तिने नेटिझन्सना विचारले आहे की हा घोटाळा (scam) तर नाही ना. तिचा हा व्हिडीओ खूप तुफान व्हायरल झाला आणि या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी असा दावा केला की त्यांना अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला ज्यामध्ये ड्रायव्हरने त्यांना पैशासाठी फसवण्याचा प्रयत्न केला. घोटाळ्याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी दीक्षित यांनी ओलाला तिच्या पोस्टमध्ये टॅग केले आहे.

“मी हे ऑनलाइन पोस्ट करावे की नाही याबद्दल मला समजत न्हवते, परंतु मला वाटले की हा एक नवीन घोटाळा असू शकतो. यामुळे मला खरोखरच अस्वस्थ वाटले आणि जर हा खरोखरच प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचा घोटाळा असेल तर मी हे शेअर करणे आणि लोकांना या नवीन घोटाळ्याबद्दल जागरूक करणे खूप महत्वाचे आहे. हे इतर कोणाच्या बाबतीत घडले असेल तर कृपया मला कळवा. @olacabs कृपया या प्रकरणात लक्ष द्या,” अशी तिने कॅप्शन देत पोस्ट केली आहे.

Mumbai: शिकागो नाही ही आहे मुंबई, अटल सेतू पुलावरील निसर्गरम्य सूर्यास्ताचा viral video बघाच!

नक्की काय झालं?

व्हिडीओमध्ये, तिने कॅब ड्रायव्हरसोबत तिचे संभाषण शेअर केले आहे जो तिला सांगतो की त्याच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे आणि त्याचे पाकीट चोरीला गेले आहे. त्यामुळे त्याला गावी जाता येत नाही. तो हे सांगून रडायलाही लागतो. दीक्षित त्याला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत असताना तो पुढे म्हणाला की त्याला आत्महत्येचे विचार येत आहेत. हे बोलून तो पुढे हे ही विचारतो की ती त्याच्याविरुद्ध तक्रार करणार की नाही, तेव्हा तिच्या मनात शंका निर्माण होते. समोरच्या आरशात तो तिचं निरीक्षण करत असल्याचंही तिच्या लक्षात आलं. पुढे ती सांगते की त्या वेळी तिने त्याला कार थांबवण्यास सांगितले आणि तिला तिच्या पतीला कॉल करण्यासाठी खाली उतरली. पण ती गाडीतून उतरताच चालकाने गाडी पळवली.

Mount Everest: माउंट एव्हरेस्टचे ३६० डिग्री दृश्य होतोय Viral, बघा मंत्रमुग्ध होणारा Video

व्हिडीओ झालाय तुफान व्हायरल

हा व्हिडीओ एक दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आला होता. तेव्हापासून, या व्हिडीओला ६.१ दशलक्षाहून अधिक व्हयुज मिळाले आहेत. हा व्हिडीओ अजूनही लोक शेअर करत आहेत. तिच्या पोस्टला अनेकांकडून प्रतिसाद मिळाला ज्यांनी दावा केला की त्यांना असेच अनुभव आले आहेत.

WhatsApp channel

विभाग